01:07pm | Apr 24, 2021 |
(प्रकाश राजेघाटगे)
पुसेगाव: कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेने त्सुनामीचे रूप घेतले असून जनतेसह शासन या महामारी पुढे हतबल होताना दिसून येत आहे. तर या लाटेत बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने कोव्हिड सेंटरमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविरसह आदी सुविधांची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत कोरोना बाधिताला उपचारासाठी त्यांचे कुटुंबिय कोरोना सेंटरसह इतर ठिकाणी बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर मिळतेय का? यासाठी धडपडत आहेत. मात्र बाधितांची संख्या जास्त व बेडची संख्या पाहता यात मोठी तफावत जाणवत असल्याने बेड मिळत नाहीत. यात शेवटचा पर्याय म्हणून बाधितांचे कुटुंबिय आपण ज्यांना प्रत्येक निवडणूकीत मतदान करतो त्यांच्याकडे जावून बेड मिळविण्यासाठी वशिला लावण्याचा प्रयत्न स्थानिक नेतेमंडळी, लोकप्रतिनीधी, नेते, पदाधिकार्यांकडे करत आहेत.
मात्र वाढते रूग्ण व कमी पडणारे बेड यामुळे नेतेमंडळीही हताश झाले असून या संकटात रूग्णांसाठी आपल्याकडे शब्द टाकणार्या असंख्य कार्यकर्त्यांना व जनतेला काय उत्तर द्यायचे हा प्रश्न त्यांना देखील पडत आहे. त्यामुळे नेतेमंडळींची चांगलीच गोची झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या या लाटेत बाधितांना कशीबशी बेडची व्यवस्था झाली तर ऑक्सिजन बेड मिळत नाही, व्हेंटीलेटर मिळत नाही, इंजेक्शन मिळत नाही अशा परिस्थितीत काय करायचे हा मोठा प्रश्न सर्वांसमोरच उभा राहिला आहे. खटाव, माण तालुक्यातील बाधितांसाठी बेड मिळत नाही म्हटल्यावर तो मिळविण्यासाठी रूग्णांचे नातेवाईक स्थानिक पुढार्यांसह गण, गट, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरील नेतेमंडळींकडे वशिला लावून बेडसाठी धडपड करत आहेत.
थोड्याफार रूग्णांना नेतेमंडळी मदत करताना दिसून येत आहेत. मात्र वाढत्या रूग्ण संख्येमुळे बाधितांसाठी बेडची बिकट अवस्था सुरू आहे. अशा परिस्थितीत बेड मागण्यासाठी संपर्क करणार्यांना काय उत्तर द्यायचे या विवंचनेत ते दिसून येत आहेत. नेत्यांनी बेड उपलब्ध नाही सांगण म्हणजे समोरच्यांना राग येण स्वाभाविक. मग तो आपल्यापासून तुटणार त्याच्याबरोबर स्थानिक पुढार्याचे आपण काम केले नाही. तो नाराज होणार या परिस्थितीत करायचे काय अशा द्विधावस्थेत नेतेमंडळी अडकले आहेत. कोरोनाच्या या महामारीत सर्वांना बेड उपलब्ध होऊन वेळेवर उपचार मिळून रूग्ण लवकर बरे व्हावेत या मानसिकतेत सर्वच नेतेमंडळी आहेत. मात्र अपुरी यंत्रणा व वाढते रूग्ण याचा ताळमेळ बसत नसल्याने तेही निरूत्तर झालेत. वाढत्या रूग्णसंख्येमुळे नेतेमंडळी हताश झाले असून बेड उपलब्ध नाहीत असे सांगून वेळ मारून नेत आहेत. आपल्या मतदाराला मदत करण्याची इच्छा असूनही ते मदत करू शकत नाहीत. अशा परिस्थितीमुळे नेतेमंडळी समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सोशल मीडियावर फिरणारी राजकीय पोस्ट खरी ठरली तर
प्रत्येक तालुक्यात विविध पक्ष कार्यरत आहेत. निवडणूका दरम्यान सर्वच पक्ष अॅक्टिव्ह होऊन जनतेने आपल्यालाच मतदान करावे, यासाठी या ना त्या मार्गाने जनतेची पॉझीटीव्हिटी तयार करत असतात. तीच जनता या कोरोनाच्या महामारीत पॉझिटीव्ह येतेय यावेळी त्यांच्यासाठी हे पक्ष काय करणार का..? हा प्रश्न निर्माण होत आहे. सोशल मीडियावर काही दिवसापूर्वी एक सूचक राजकीय पोस्ट फिरताना दिसून येत होती. विविध पक्षांनी आपल्या नावाने कोविड सेंटर उभारावित.
सर्वच मोठे पक्ष आर्थिकदृष्ट्या सदृढ आहेत. प्रत्येक पक्षाने तालुक्यात किंवा जिल्ह्यात एक जम्बो कोव्हीड हॉस्पीटल सुरू करून आपआपल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना म्हणजे आपल्याला मतदान करणार्यांपैकी कोणी कोरोना बाधित असेल तर त्यांना बेड व इतर सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्यावर गरजेनुसार उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले तर कोणाचाच या महामारीत बळी जाणार नाही. ही सूचक राजकीय पोस्ट खरी व्हावी अशी वाटत असली तरी कोणता पक्ष यासाठी पुढाकार घेणार हे ही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |