सातारा : प्रभू श्रीरामचंद्राच्या 14 वर्षाच्या वनवासाची सांगता अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम श्री लक्ष्मण व श्री सीतेसह गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर परत आल्यानंतर हा गुढीपाडवा उंच गुढ्या उभारून साजरा केला जातो. तसेच मराठी नववर्षही मोठ्या उत्साहात गुढीपाडव्याला उंचच उंच गुढ्या उभारून साजरे केले जाते. यावर्षी शोभन नाम संवत्सर सुरू झाले. यानिमित्त सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने घराच्या पुढे बांबूच्या मोठ्या गुढ्या उभारून या नववर्षाचे स्वागत केले.
सकाळी हा ब्रम्ह ध्वज अर्थात गुढी उभारताना पंचोपचार पूजन करून या गुढीला साखरी गाठी, लिंबाचा डहाळा, चाफ्याच्या फुलांची माळ, रेशमी वस्त्र तसेच भरजरी साडी नेसून त्यावर तांब्याचा तांब्या उपडा घालून गंध, हळद, कुंकू, फुले वाहून ही गुढी उंच आकाशात उभारण्यात आली. त्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून धूपदीप दाखवल्यानंतर दुपारी या गुढीला महानिवेद्य दाखवण्यात आला.
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी अतिशय महत्त्वाचा सण मानला जात असल्यामुळे घरोघरी पुरणपोळी, श्रीखंड, आम्रखंड, रसमलई, बासुंदी आदी पक्वानांचे बेत आखण्यात आले होते. दुपारनंतर घरोघरी पंचांग स्थित श्री गजाननाचे पूजन करून पंचांग वाचन कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर या उभारण्यात आलेल्या गुढ्या पंचोपचार पूजन करून उतरवण्यात आल्या.
दरम्यान गुढीपाडव्याचा साडेतीन मुहूर्ताचा मुहूर्त साधून अनेक नागरिकांनी सोने -चांदी तसेच गृहपयोगी वस्तूंची मोठ्या उत्साहात खरेदी केली. सध्या सोने आणि चांदीचे भाव वाढत असले तरी मुहूर्ताचा दिवस लक्षात घेऊन सोने-चांदी खरेदीसाठी सराफी बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी झाली होती.
सातारा शहरातील श्री काळाराम मंदिर येथे श्री राम नवमी उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मंदिरातील श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्तीला विशेष अलंकारांनी तसेच भरजरी वस्त्रांनी सुशोधित करण्यात आले होते. या रामनवमी महोत्सवामध्ये दररोज सकाळी पाच ते साडेपाच या वेळेत काकड आरती, सकाळी सहापर्यंत श्रीराम मूर्तीला अभिषेक, सकाळी आठ वाजता आरती, दुपारी बारा वाजता नैवेद्य वेदमूर्ती शैलेश केळकर गुरुजी यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच दुपारी 4 वाजता दररोज विविध भजनी मंडळांचे कार्यक्रम असून सायंकाळी सहा ते सात या वेळेत 30 मार्चपर्यंत रामनवमी अखेर राष्ट्रपती पारितोषिक विजेते वेदशास्त्र संपन्न श्रीकृष्ण शास्त्री जोशी यांचे अध्यात्म रामायण या विषयावर प्रवचन होणार आहे. दररोज रात्री साडेनऊ वाजता महाआरती संपन्न होणार आहे, अशी माहिती शहा परिवार व काळाराम मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने देण्यात आली.
या उत्सव काळात शनिवार दिनांक 25 मार्च 2023 रोजी सायंकाळी सात वाजता पुष्पप्रभा आयोजित स्वरविहार हा भजन व भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर होणार असून यामध्ये गजानन चौधरी गायन करणार असून निवेदन सौ.अपर्णा शहा यांचे, यावेळी वादक म्हणून अनिकेत चौधरी सहसाथ करणार आहेत.
रविवारी 26 मार्च 2023 रोजी सायंकाळी सात वाजता कलाविष्कार नृत्य संस्था सातारा यांचे वतीने शर्वरी राजे भोसले, आचल राजेभोसले, श्रद्धा जाधव, सायली नलावडे, अंजू मोरे, सायली सोनटक्के या नृत्याविष्कार सादर करणार आहेत.
सोमवारी 27 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता जय सद्गुरु मंडळांचा एकतारी भजन व भक्ती गीत भावगीतांचा कार्यक्रम होणार आहे. 28 मार्च मंगळवारी सायंकाळी सात वाजता कलासाधना भरतनाट्यम अकॅडमी सातारा यांचे तर्फे वैष्णवी देवी व गायत्री देवी यांचा रामायणावर आधारित नृत्य पुष्प सादर होणार आहे.
गुरुवार दिनांक 30 मार्च रोजी रामनवमीनिमित्त सकाळी 11 ते साडेबारा या वेळेत वेदशास्त्र संपन्न चंद्रशेखर शास्त्री जोशी यांचे राम जन्मावर प्रवचन व रामजन्म सोहळा होऊन रात्री पावणेदहा वाजता महाकर्पूर आरती संपन्न होणार आहे .
शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी रामनाम रामनवमी उत्सवाची सांगता ललिताच्या कीर्तनाने होणार आहे व सायंकाळी सात वाजता महाप्रसाद वितरण होणार आहे अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान रामनवमी उत्सवाच्या आयोजनासाठी सातारा शहरातील प्रतापगंज पेठेतील श्री गोरा राम मंदिर, शनिवार पेठ येथील श्री शहा राम मंदिर, समर्थ मंदिर नजीकच्या श्री दामले राम मंदिर, शाहूपुरी गेंडामाळ येथील पाटील परिवाराच्या श्री शांत राम अर्थात राम ध्यान मंदिर, फुटका तलाव नजीकच्या श्री माटे राम मंदिर, संगम माहुली, सज्जनगडावरील श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधीवरील श्री राम मंदिरात, फलटण येथील नाईक निंबाळकर यांच्या राजघराण्याच्या राम मंदिरात तसेच माण तालुक्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या जन्म गावी श्री थोरले राम मंदिर व श्री धाकटे राम मंदिरात तसेच माण तालुक्यातील वावरहिरे येथील श्रीराम मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |