11:00pm | Jul 08, 2020 |
पुसेगाव : कृषि तंत्रज्ञान शेतक-यापर्यत पोहोचविणे व उत्पादनखर्च कमी करणे याउद्देशाने कृषि विभागामार्फत सुरु असलेल्या शेतीशाळेमधून शेतक-यांनी सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीची सुत्रे अवलंबिल्यास अधिक उत्पादन घेणे शक्य हाईल असे प्रतिपादन कृषि पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे यांनी काटकरवाडी तालुका खटाव येथे झालेल्या शेतीशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले.
महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्यावतीने खरीप हंगामामध्ये पुसेगाव मंडळ कृषि अधिकारी अंतर्गत प्रत्येक सजामध्ये, घेवडा, सोयाबीन व ऊस यापिकाच्या शेतीशाळा सुरु असून मंडळअधिकारी सचिन लोंढे यांचे मार्गदर्शनानुसार सुरु आहेत. या शेतीशाळेमधून त्या पिकांचे तांत्रीक मार्गदर्शन, प्रायोगिक भाग, लघुअभ्यास, निरीक्षणे यामाध्यमातून पेरणीपुर्व ते काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान शिकविले जाणार आहे.
शेतीशाळेची सुरवात कृषि सहाय्यक कुंडलिक जाधव यांनी प्रतिज्ञा करुन केली, नंतर शेतीशाळेचा उद्देश त्यांनी उपस्थित शेतक-यांना सांगीतला. या शेतीशाळेत मार्गदर्शन करताना कृषि पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे म्हणाले की, काटकरवाडीमधील सोयाबीनची उत्पादकता व कृषि विद्यापीठामधील उत्पादकतेमधील फरक अभ्यासाला असता कमी उत्पादकतेचा अभ्यास सविस्तरपणे केला. सोयाबीनच्या उत्पादकतेत वाढ होणेसाठी, बियाणे, बिजप्रक्रीया, पेरणी, खत व्यवस्थापन याबद्दल सविस्तरपणे मार्गदर्शन करणेत आले. उपस्थित शेतक-यांचे शंकानिरसन झालेनंतर सांघीक खेळाने शेतीशाळेची सांगता झाली. शेतीशाळेची नियोजन धनराज काटकर, रविंद्र काटकर, विकास निकम, सचिन काटकर, प्रशांत काटकर यांनी केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |