06:16pm | Dec 30, 2020 |
वाई : मांढरदेव (ता. वाई) येथे मंगळवारी बेवारस पुरूषाचा मृतदेह आढळून आल्याबाबतची फिर्याद पोलिस पाटील जयश्री मांढरे यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली होती. त्या मृतदेहाची ओळख पटली असून संबंधित युवकाचा अज्ञात व्यक्तींनी खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह फेकून दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
मांढरदेव येथे काळूबाईची जाळी जुने ठाण येथील पूलाच्या डाव्या बाजूस आढळून आलेला मृतदेह मारळगाव ता.कल्याण,जि.ठाणे येथील व्यक्तीचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संदिप शांताराम कदम असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत वाई पोलिसांकडून मिळालेली महिती अशी की, मांढरदेव परिसरात अंदाजे 35 ते 40 वर्षांच्या पुरूष जातीचा मृतदेह आढळून आल्याबाबतची फिर्याद पोलिस पाटील जयश्री मांढरे यांनी दिली होती. दरम्यान, मृत व्यक्तीच्या पत्नी संजना संदिप कदम (मुळ रा.मु.निगवणी पो.पालवणी ता, मंडणगड जि.रत्नागिरी हल्ली रा. रुम नं 4 सिध्दीविनायक बेस्ट कॉलनी रोक्टर न 2 मु. मारळगाव पो. वरद ता. कल्याण जि. ठाणे) यांनी कल्याण पोलिस ठाण्यात पती मिसिंग झाल्याबाबतची तक्रार नोंदवली होती.
मृत व्यक्तीच्या नावे मारुती सुझुकी कंपनीची वॅगनार कार नं एम एच 01 सीजे 0288 असून ते गेल्या चार वर्षांपासून खाजगी भाडे व ओला कंपनीची भाडी करतात. दि. 20 रोजी दुपारी पुणे येथील भाडे सोडून संदिप कदम दुपारी 2.30 वा चे सुमारास घरी परतले होते. त्याच दिवशी सायंकाळी त्यांच्या मोबाईलवर फोन आल्यानंतर कळंबोली ते कोल्हापूर असे भाडे मिळाले असल्याचे सांगून ते घरातून बाहेर पडले. घरातून बाहेर पडल्यानंतर दि.21 रोजी दुपारी 2.00 वा व रात्री 9.30 वा च्या सुमारास पती व पत्नीचे संभाषण झाले होते. त्यानंतर मात्र त्यांना फोन बंद लागत होता. दि.23 डिसेंबरपर्यंत पतीशी संपर्क होत नसल्याने पत्नी संजना कदम यांनी नातेवाईंना फोन करून याबाबत चौकशी केली. परंतु काहीही माहिती न मिळाल्याने अखेर त्यांनी कल्याण तालुका जि. ठाणे पोलीस स्टेशन येथे माझे पती मिसिंग झाले बाबतची तक्रार मिसिंग नोंद केली. दि.29 डिसेंबर रोजी कल्याण तालुका पोलिसांनी त्यांना वाई पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. त्यानंतर संजना कदम, दिर दिपक सिताराम कदम, माझे पतीचे मित्र मंगेश मनोहर माने यांनी वाई पोलिस ठाण्यात आल्यानंतर एम.आय.डी.सी. वाई येथे असलेल्या शवागृहात ठेवलेले अनोळखी इसमाचे प्रेत पाहिले. त्यानंतर तो मृतदेह त्यांच्या पतीचाच असल्याचे सांगितले.
दरम्यान अज्ञात ठिकाणी, अज्ञात हत्याराने जीवे ठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने माझे मयत पती संदिप शांताराम कदम यांच्या प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या हेतुने त्याचे प्रेत मांढरदेव ता.वाई, जि. सातारा गावचे हद्दीत मांढरदेव गडावरील घाटात कठडयाच्या खाली टाकले असल्याबाबत माझी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरण करून खुनाचा गुन्हा दाखल केला असून तो कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी तपास केला. हावलदार शिवाजी वायदंडे, विजय शिर्के, प्रशांत शिंदे कृष्णराज पवार यांनी सहाय्य केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |