08:54pm | Jan 25, 2022 |
पुसेगाव : इस्त्रायल येथील इंडो- इस्त्रायल सेंटर ऑफ एक्सलन्स चे प्रमुख शास्त्रज्ञ याईर इशेल यांनी पुसेगाव ता खटाव येथील कांदा उत्पादक शेतकरी व बागायतदार अधिक जाधव यांच्या कांदा शेताला भेट देऊन सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी इशेल यांच्या सोबत महाराष्ट्र शासन फलोत्पादन विभागाचे उपसंचालक प्रवीण गवांडे,पुण्याचे मास्टर ट्रेनर डुंबरे नेटाफेम इरिगेशन इंडिया प्रा.लि. चे कृषी विद्या विभागप्रमुख अरुण देशमुख,व्यवस्थापक अनिल बिटले,नेटा फेम कंपनीचे तालुक्यातील मुख्य वितरक व पुसेगाव येथील श्री सेवागिरी इरिगेटर्स चे संचालक चंद्रशेखर क्षीरसागर,अधिक जाधव व शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांशी सवांद साधताना इशेल म्हणाले, कांदा पिकाचे दुप्पट उत्पादन घ्यायचे असेल तर एकाच बेड वर ठिबकच्या दोन इनलाईन असल्याच पाहिजेत.त्यामुळे पाणी व खत व्यवस्थापन उत्तमरीत्या होऊन लागण केलेल्या क्षेत्रात उत्पादनात घसघशीत दुप्पट वाढ होते.यावेळी इशेल यांनी ठिबक च्या माध्यमातून कांदा पिकाचे खत व पाणी व्यवस्थापन कसे करावे, कमी खर्चात कांद्याचे भरघोस उत्पादना कसे घ्यावे याबाबत शेतकऱ्यांना काही क्लुप्त्या ही दिल्या.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना कमी पाण्यावर शेती व अधिक उत्पादन करण्यासाठी ठिबक तसेच तुषार सिंचनासाठी योग्य निकषानुसार सुमारे ८०% भरीव अनुदान दिले जात आहे त्याचा शेतकऱ्यानी फायदा घेऊन त्याच्या वापरावर अधिकाधिक भर द्यावा असे आवाहन उपसंचालक प्रवीण गवांडे यांनी केले. तर नेटाफेम कंपनीची १६एम एम पीसीनेट ड्रीपर एका फुटावर सुमारे दोन लिटर पाण्याचा डिस्चार्ज करत असल्याने पिकांना खत व पाण्याचे योग्यरीत्या एकसारखे व्यवस्थापन होत असल्याचे अरुण देशमुख यांनी सांगितले. चंद्रशेखर क्षीरसागर यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.
शिवथरला नऊ महिन्याचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ |
आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी होणार |
साताऱ्यात पोलिसांवरच आंदोलन करण्याची वेळ |
अविनाश भोसलेंना अटक झाली; जिल्ह्यातील हस्तक अधिकार्यांना कधी? |
पुणे-महाबळेश्वर बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |
परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत |
गुणवंत विद्यार्थ्यांनी गौरीशंकरची शैक्षणिक प्रतिमा उंचविली : श्रीरंग काटेकर |
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २.४४ लाख पदे रिक्त |