सातारा: टिक टॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूला जबाबदार असणार्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन तिला न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चाने आज येथील बाँम्बे रेस्टॉरंट परिसरात चक्का जाम आंदोलन केले. दरम्यान, पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूची सरकार चौकशी करणार आहे का नाही? असा प्रश्न भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सुवर्णा पाटील यांनी उपस्थित केला.
याबाबत भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष सुवर्णा पाटील म्हणाल्या, पूजा चव्हाण हिचा 7 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला 11 दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी या घटनेबाबत प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला नाही. पूजा चव्हाण हिच्या ऑडिओ क्लिपमधील संवादावरून संबंधित व्यक्तीची पोलिसांनी साधी चौकशी केलेली नाही. पोलिस हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसले आहेत. याचा अर्थ पोलिसांवर सत्ताधार्यांचा दबाव आहे. महिलांच्या प्रतिष्ठेबाबत सातत्याने बोलणारे पुरोगामी नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार करणार्या सरकारच्या काळात एका तरूणीच्या मृत्यूकडे इतक्या असंवेदनशील पद्धतीने पाहिले जात आहे याची खंत वाटते.
पूजा चव्हाण हिच्या मृत्यूबाबत जे जे पुरावे बाहेर आले आहेत. त्या सर्व पुराव्यातून या प्रकरणाची संजय राठोड यांचा संबंध आहे हेच दिसून येते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राठोड यांना अभय दिले जात असल्याचेही दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा. त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे. राठोड यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा सुवर्णा पाटील यांनी दिला आहे.
यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष स्मिता निकम, भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, गणेश पालखे, शहर उपाध्यक्ष वैष्णवी कदम, निर्मला पाटील, हेमा भणगे, उत्तम गिरमे, जयदीप ठुसे उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |