05:00pm | Apr 29, 2022 |
पुणे : महाराष्ट्रासह मध्य, वायव्य आणि उत्तर भारताच्या अनेक भागांत गुरुवारी तीव्र उष्णतेच्या लाटेने कहर केल्याचे दिसून आले. देशातील 36 पैकी 18 हवामानशास्त्रीय उपविभागांमधील तब्बल 76 केंद्रांवर गुरुवारी 43 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदले गेल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) सांगण्यात आले.
देशात गुरुवारी सर्वाधिक तापमान उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 45.9 अंश सेल्सिअस; तर राज्यात चंद्रपूर येथे 45.8 अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि राजस्थानच्या पश्चिम भागांत अनेक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट सक्रिय असून, त्या भागांत कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदले जात आहे.
गुजरात, राजस्थानच्या वाळवंटी भागांतून उष्ण आणि कोरडे वारे उत्तर भारतासह मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. याचा परिणाम म्हणून देशाच्या मोठ्या भूप्रदेशात सध्या कमाल तापमान चाळीस अंशांच्या वर नोंदले जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोरड्या हवेमुळे मध्य आणि वायव्य भारतात उष्णतेच्या लाटेची ही स्थिती आणखी किमान पाच दिवस राहण्याची शक्यता असून, राज्यात मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात पुढील दोन दिवसांत काहीशी घट होण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.
उष्णतेच्या लाटेचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होण्याची शक्यता असून, शारीरिक श्रमाच्या कामांसाठी दुपारची वेळ टाळावी, सूर्यप्रकाशात फिरणे टाळावे, नियमितपणे पाणी प्यावे, असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे.
राज्यातील शहरे शहर कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे 41.8, नगर 44.5, जळगाव 45.6, नाशिक 41.1, सातारा 41.2, सोलापूर 43.4, औरंगाबाद 42.4, परभणी 43.8, नांदेड 42.8, अकोला 45.4
शिवथरला नऊ महिन्याचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ |
आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी होणार |
साताऱ्यात पोलिसांवरच आंदोलन करण्याची वेळ |
अविनाश भोसलेंना अटक झाली; जिल्ह्यातील हस्तक अधिकार्यांना कधी? |
पुणे-महाबळेश्वर बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |
परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत |
गुणवंत विद्यार्थ्यांनी गौरीशंकरची शैक्षणिक प्रतिमा उंचविली : श्रीरंग काटेकर |
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २.४४ लाख पदे रिक्त |