(प्रकाश राजेघाटगे)
बुध: ‘लहरोंसे डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालोंकी कभी हार नही होती’ याचा प्रत्यय जाखणगाव (ता.खटाव) येथील विक्रम बाळासाहेब गाढवे यांनी सीएच्या परीक्षेत मिळवलेल्या घवघवीत यशाकडे पाहून येतो. तब्बल 11 वेळा आलेल्या अपयशाने खचून न जाता प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर रोजचे बारा, बारा तास अभ्यासाला प्रामाणिकपणे वाहून घेतले. मोठा भाऊ अजिंक्यच्या सातत्याने पाठीवर हात ठेऊन व लढ म्हणून तन, मन व धनाने केलेल्या सहकार्यामुळेच अवघड समजल्या जाणार्या सीए परीक्षेत त्याने यश खेचून इतरांसाठी आदर्श निर्माण केला.
विक्रमने ज्या परिस्थितीतून यश मिळवलेय ते खरोखरच कौतुकास्पद आहे. वडील बाळासाहेब गाडवे मुंबईमध्ये मिल कामगार म्हणून कार्यरत होते. मिल कामगारांच्या संपात अनेक कामगारांची व कुटुंबाची वाताहात झाली. बाळासाहेबांनी त्यानंतर पत्नी व तीन मुलांच्या सहीत गावचा रस्ता धरला. गावाकडे दुष्काळ पाचवीलाच पुजल्याने आयुष्याची परवड सुरूच होती. कधी स्वतःच्या शेतात तर कधी दुसर्याच्या शेतात मोलमजूरी करत उदरनिर्वाह सुरू होता. दरम्यान मोठा मुलगा अजिंक्यने मुंबईतच राहून प्रसंगी रिक्षा चालवून शास्त्र शाखेची पदवी संपादन केली. त्यानंतर अजिंक्यला पुण्यात ‘मनकाईंड’ कंपनीत चांगल्या पदाची नोकरी मिळाली. अजिंक्यच्या नोकरीमुळे कुटुंबाला मोठा आधार मिळू लागला. अजिंक्यच्या आर्थिक सहकार्यामुळे विक्रम व छोटी बहीण पल्लवीचे शिक्षण सुरू राहिले.
भावाच्या सहकार्याने अजिंक्यचा शैक्षणिक प्रवास सुलभ होऊ लागला. मात्र तरीही विक्रम घरोघरी दुध घालून कुटुंबाला हातभार लावण्याचे काम करतच होता. दहावी पर्यंतचे शिक्षण जाखणगाव येथे घेतल्यानंतर त्याने खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयामधून वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक पटकावून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने व्हेटरनरीचा कोर्स करून गावात व खेडोपाड्यात पशुवैद्यकीय व्यवसाय करून चार पैसे कमवू लागला. मात्र व्यवसायाला सुरवात केल्यानंतर दुसर्याच वर्षी प्रचंड मोठा दुष्काळ पडला. जनावरांना खायला चारा व पिण्यास पाणी नसल्याने टेम्पोने जनावरे नदीकाठच्या गावात सोडून दिली. साहजिकच विक्रमला देखील आपला व्यवसाय बंद करून उदरनिर्वाहासाठी पुण्याला आपल्या भावाकडे यावे लागले. बंधू अजिंक्यने त्याला मानसिक आधार देत संकटालाच संधी मानून काहीतरी वेगळ करण्याचा सल्ला दिला. या प्रसंगाने त्याच्या जिवनाला कलाटणी मिळाली. त्याचवेळी विक्रमने सीए होण्याचा निर्धार केला.
त्यानंतर सीएच्या तयारीला सुरवात झाली. आजतागायत कसलाच खासगी तास न लावत परीक्षेसाठी नाव नोंदवून फक्त पुस्तक विकत घ्यायची व अभ्यासाला लागायचे असा दिनक्रम सुरु झाला. पहिल्याच परीक्षेत मिळालेल्या अपयशाने विक्रमला त्याने निवडलेल्या क्षेत्रात सहजासहजी यश मिळणार नसल्याची जाणिव झाली. त्यानंतर सलग 11 वर्षे त्याने खडतर अभ्यास करूनही आलेल्या अपयशाने खचून न जाता 12 व्या प्रयत्नात त्याने यशाला गवसणी घातली.
‘सातत्याने येणार्या अपयशाला तोंड देण्यासाठी गरिबीचे दुष्टचक्र मनात दुप्पट इच्छाशक्ती व जिद्द निर्माण करत होती. माझा देवासारखा मोठा भाऊ, वहिणी, आईवडील व बहीण पल्लवी यांची नेहमीच साथ मिळत गेल्याने हा खडतर प्रवास सुखकर वाटला.’
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |