03:09pm | Jan 27, 2022 |
पुसेगाव : खटाव तालुक्यातील शेतीपुरक व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. एकीकडे शेतीच्या उत्पादनातील तोट्यामुळे शेतकरी हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुध उत्पादनाकडे पाहतो, तर दुसरीकडे कोरोनामुळे जनावरांच्या गेल्या दीड ते दोन वर्षा पासुन बाजार बंद असतान मध्यंतरीच्या काळात बाजार सुरू झाले. शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय करण्यासाठी लॉकडाऊन काळातही व त्यानंतर इतरत्र शोध घेऊन चढ्या भावाने दुभत्या गायी, म्हशी खरेदी करून व्यवसाय सुरू केला. परंतु, ऐन महागाईच्या काळात शेतकर्यांना आर्थिक चणचण जाणवत असताना जनावरांच्या खाद्य दरात भरमसाठ वाढ झाल्याने तालुक्यातील शेतीपुरक व्यवसाय करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी बाजार झाल्यानंतर दुभती जनावरे खरेदी केली होती. काही दिवसांपासुन पशुखाद्य महागल्याने दुध व्यावसायीक शेतकरी अडचणीत आले आहेत. बहुतेक शेतकरी हे शेतीला पूरक असा व्यवसाय म्हणून भाजीपाला 'फुलशेती, फळबाग, कुकुटपालन, शेळीपालन, दुध या शेतीपूरक व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र, या पशु खाद्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून किरकोळ स्वरूपात ५० ते ६० रुपये किलो प्रमाणे मिळत आहे. सर्वच पशुखाद्याचे भाव असेच वाढत राहिले तर दूध व्यवसायाचे अर्थकारण कोलमडणार असल्याचे चित्र आहे.
खटाव तालुक्यात शेतीपुरक व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालतो. त्यात पशु खाद्याचे दर वाढल्याने शेतकरी पशु कमी करण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे एकीकडे दुधाच्या किमती स्थिर आहेत, तर दुसरीकडे पशुखाद्याचे दर वाढतच आहेत. त्यामुळे दुध व्यवसायाच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दुधापेक्षा पशु खाद्यावर अधिक खर्च होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. दुधाचा व्यवसाय परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपले पशुधन कवडीमोल भावात विकावे लागते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |