08:17pm | Feb 24, 2021 |
सातारा : येथील शाहूपुरी परिसरातील श्री वरद विनायक अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सहा. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह त्यांच्या पथकाने मंगळवारी रात्री उशिरा टाकलेल्या छाप्यात 2 लाख 3 हजार 220 रुपये रोख रक्कम, तर 8 लाख 35 हजार 950 रुपये किंमतीच्या दोन चारचाकी वाहने, सहा दुचाकी आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले. जुगार खेळणार्या पन्नासजणांना अटक करण्यात आली आहे. नवीन वर्ष सुरु झाल्यानंतर सातार्यात ही सर्वात मोठी कारवाई झाल्याचे मानण्यात येते.
याबाबत सहा. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आलेली बातमी अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्री वरद विनायक अपार्टमेंट या इमारतीमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती सहा. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक यादव, पोलीस हवा. मुल्ला यांच्यासह त्यांच्या पथकाला पाचारण करुन आंचल दलाल यांनी तशी खातरजमा करुन घेवून सहा. पो. अधीक्षक कार्यालयातील पथक व पोलीस मुख्यालयातील साध्या वेशातील कर्मचारी यांना सोबत घेवून श्री वरद विनायक अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये छापा टाकला असता त्याठिकाणी जुगार अड्डा सुरु असल्याचे निदर्शनास आले. आंचल दलाल यांनी दिलीप नामदेव इरळे यांच्याकडे तुमच्याकडे तीनपानी जुगार खेळण्याचा परवाना आहे का, असे विचारले असता इरळे यांनी नकार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याठिकाणी छापा टाकला. प्रभाकर गणपतराव बर्गे (वय 57, रा. दत्तनगर, कोरेगाव), संदीप चंद्रकांत देवकुळे (वय 35, रा. मंगळवार पेठ, सातारा), सतीश रमेश अवघडे (वय 31, रा. मंगळवार पेठ, सातारा), सुरेश बाळकृष्ण रोमण (वय 42, रा. जुना मोटर स्टॅण्ड, कोरेगाव), दीपक लक्ष्मण फाळके (वय 41, रा. सातारारोड, कोरेगाव), राजेंद्र अशोक तपासे (वय 39, रा. वर्ये, ता. सातारा), अस्लम मेहबुब शेख (वय 37, रा. सदरबझार, सातारा), सतीश चंदर गाढवे (वय 48, रा. आंब्रे, ता. बारामती), असिफ शफीक सय्यद (वय 50, रा. सातारारोड, ता. कोरेगाव), परवेझ जब्बार शेख (वय 40, रा. गुरुवार परज, सातारा), रामरतन रामदेव सिंग (वय 49, रा. स्वारगेट, पुणे), दत्तात्रय अरुण कदम (वय 34, रा. गुडगल्ली, कोरेगाव), आनंद तानाजी बर्गे (वय 41, रा. आझाद चौक, कोरेगाव), संतोष बबन किर्दत (वय 45, रा. करंजेपेठ, सातारा), गोरख श्रीधर आवळे (वय 26, रा. मालगांव, ता. सातारा), निलेश काशिनाथ देशमुख (वय 32, रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव), अब्दुल अजीज महंमद हनीफ शेख (वय 51, रा. शनिवार पेठ, सातारा), संपत चंदर बानगुडे (वय 49, रा. मुर्ती, ता. बारामती) यांच्यासह एकूण 50 जण त्याठिकाणी जुगार खेळताना आढळून आले.
संबंधित पन्नासजणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 लाख 3 हजार 220 रुपये रोख रक्कम 8 लाख 35 हजार 950 रुपये किंमतीच्या दोन चारचाकी, सहा दुचाकी व मोबाईल्स असा एकूण 10 लाख 36 हजार 270 रुपयांचा रोख रक्कम व ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
आंचल दलाल यांचा धडाका
सहाय्यक पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर आंचल दलाल यांनी कारवायांचा धडाका सुरु केला आहे. नवीन वर्षात सातारा शहरात जुगार अड्ड्यांवर छापा टाकून सर्वात मोठी कारवाई करण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यामुळे सहा. पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्वच कर्मचार्यांचे पोलीस दलात कौतुक होत आहे.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |