10:16pm | Nov 19, 2020 |
सातारा : जिल्ह्यात गुरुवारी 863 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात 107 बाधितांची नोंद, तर 6 बाधितांचा मृत्यू झाला. तसेच 1552 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
गुरुवार हा सातारकरांसाठी दिलासादायक दिवस ठरला. जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 863 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 46 हजार 654 वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यात 107 बाधितांची नोंद झाल्याने एकूण बाधितांची संख्या 49 हजार 404 वर पोहोचली आहे. दरम्यान 6 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण कोरोनाबळींची संख्या 1 हजार 659 वर पोहोचली असून 1552 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
6 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये फलटण येथील 55 वर्षीय पुरुष, भुर्कावाडी ता. खटाव येथील 82 वर्षीय पुरुष. जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये दहिवडी ता. माण येथील 43 वर्षीय पुरुष, पुळकोटी ता. माण येथील 75 वर्षीय महिला, बिदाल ता. माण येथील 68 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशिरा कळविलेले सोमनाथआळी ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष अशा एकूण 6 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
1552 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 54, कराड येथील 70, फलटण येथील 163, कोरेगांव येथील 203, वाई येथील 106, खंडाळा येथील 159, रायगांव येथील 84, पानमळेवाडी येथील 198, मायणी येथील 83, महाबळेश्वर येथील 110, पाटण येथील 28, दहिवडी येथील 50, खावली येथील 89, म्हसवड येथील 60, पिंपोडे 36 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 59 असे एकूण 1552 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |