01:47pm | Jan 14, 2021 |
सातारा: रविवार पेठेतील प्रभाग क्र.6 मधील पाणीपुरवठा अखेर सुरळीत झाला. नगरसेवक श्रीकांत आंबेकर आणि नगरसेविका सविता फाळके यांनी याबाबत दाखवलेल्या तत्परतचे रविवार पेठेतून कौतुक केले जात आहे. दरम्यान प्रभाग क्र. 6 मधील बगाडे हॉस्पिटल चौकातील पाण्याच्या लाईनमध्ये बिसलेरी तसेच शॉपूच्या बाटल्या अडकल्याने पाणी पुरवठा बंद झाला होता. या ठिकाणचे चोकअप काढल्यानंतर हा भाग 6 दिवसांत टँकरमुक्त झाला आहे.
रविवार पेठेतील नागरिकांनी पाणीपुरवठा बंद असल्याबाबतची तक्रार पालिकेकडे केल्यानंतर नगरसेवक श्रीकांत आंबेकर, नगरसेविका सविता फाळके यांनी सदर पाईप लाईन रस्त्याच्या मध्यभागी कट करून लाईनमधील सदर चोकअप काढले. प्रभाग क्र.6 मधील बगाडे हॉस्पिटल चौकातून पोवईनाक्यापर्यंत गेलेल्या पाण्याच्या पाईपलाईनचे आज रोजी चोकअप काढले असता. सदर लाईनमध्ये मानस हॉटेल पाठीमागील घोरपडे टाकीतून बिसलेरीच्या तसेच शांपूच्या बॉटल्स व पाउच निघाल्या. यामुळे गेल्या 6 दिवसांपासून रविवार पेठेतील सर्वोदय कॉलनी, क्षिरसागर कॉलनी, कैकाडी वस्ती या भागातील नागरीकांना पाणी येणे बंद झाले होते.
मुख्याधिकारी अभिजीत बापट, पाणीपुरवठा सभापती सिता हादगे, स्थानिक नगरसेवक श्रीकांत आंबेकर तसेच नगरसेविका सविता फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे काम करण्यात आले असून याकामी न.प.चे कर्मचारी संजय घाडगे, संदीप सावंत, संतोष घाडगे, श्री. बावणे, नंदकुमार कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी बलभीम शिंगरे, नंदकुमार आंबळे, महेश क्षिरसागर, शुभम क्षिरसागर, संदिप क्षिरसागर, नितीन क्षिरसागर इ. नागरीक उपस्थित होते.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |