01:02pm | Aug 31, 2020 |
बुध: पुसेगाव व परिसरात दरवर्षी सार्वजनिक नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. पण यावर्षी या सार्वजनिक नवरात्रोत्सवावर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे सावट आहे. पुसेगाव व परिसरात पुसेगाव पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे 88 सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी पुसेगाव येथे 16 मंडळे आहेत.
दरवर्षी येथे ही सर्व मंडळे मोठ्या उत्साहाने दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करुन नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा करतात. या कालावधीत विविध मंडळांद्वारे समाजप्रबोधनपर देखावे साजरे केले जातात. तसेच गावांमधून आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. यावर्षी कोरोना प्रसारामुळे विविध धार्मिक सण सार्वजनिकपणे साजरे करण्यास प्रशासनातर्फे प्रतिबंध करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपुर्वी केवळ मोठ्या शहरांमध्ये आढळणार्या कोरोना साथीने आता ग्रामीण भागातही मोठ्याप्रमाणात हातपाय पसरले आहेत.
पुसेगाव परिसरात आतापर्यंत 175 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पुसेगाव येथील कोरोना रुग्णांचा आकडा पंचवीशी पार गेला आहे. परिसरात कोरोनामुळे मयत होणार्या व्यक्तींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. पुसेगाव, खटाव, खातगुण, विसापूर, वेटणे, नेर, बुध, निढळ, डिस्कळ येथे व या गावांच्या आसपासच्या छोट्या गावांतही कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले आहेत. एकंदरीत पुसेगाव परिसरात कोरोनाप्रसार झपाट्याने वाढत आहे. पण अजूनही लोक स्वतःची काळजी घेताना दिसत नाहीत. पुसेगाव बाजारपेठेत तर ग्राहकांची मोठी गर्दी होत असून सोशलडिस्टन्सींगची सर्रास पायमल्ली करुनच व्यवहार सुरु आहेत.
अनेकांच्या तोंडाला मास्क नसतात. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पुढील दीड महिन्यांत येणारा नवरात्रोत्सव साजरा होणार का अशी शंका अनेकजण व्यक्त करत आहेत. दरम्यान कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली तर पुसेगाव व परिसरात सार्वजनिक शारदोत्सव साजरा होऊ शकणार नसल्याचे पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी सांगितले. यावर्षी गणपती उत्सवात गावोगावी भेटी देऊन पुसेगाव पोलिस ठाण्यातर्फे संबंधीत गावांच्या ग्रामपंचायतीत सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना कोरोनाप्रसाराचे गांभीर्य समजाऊन सांगितले व यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास सर्वच मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोरोनाची अशीच परिस्थिती राहिली तर सामाजिक आरोग्याच्या सुरक्षिततेचा विचार करुन नवरात्रोत्सव मंडळांनाही सार्वजनिकपणे नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत प्रशासनाद्वारे प्रतिबंध केला जाईल, सार्वजनिक हिताचा विचार करुन सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना आवाहन करण्यात येईल असे श्री. घोडके यांनी सांगितले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |