पुसेगाव : येथील सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनी कॉलेज पुसेगावचे प्राचार्य श्रीधर जाधव नियत वयोमानानुसार आपल्या 33 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले.
त्यांनी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत स्मार्ट पीटी तज्ञ मार्गदर्शक, इयत्ता 1ली ते 8वी आशय समृध्दी तज्ञ मार्गदर्शक, बदलणारे गणित इयत्ता 9वी, 10 वी दहा वर्ष तज्ञ म्हणून काम केले होते. सन2014 मध्ये संस्थेचा उत्कृष्ट सेवा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघ व सातारा जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या वतीने या वर्षी आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. इयत्ता 5वी, इयत्ता 8वी स्कॉलरशीप तसेच एमएमएमएस परीक्षेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना नेत्रदिपक यश मिळाले. त्यांनी विविध मंडळांना मार्गदर्शन केले तसेच अनेक शाळांत प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना स्पर्धा परिक्षेचे महत्व पटवून दिले. विज्ञान छंद मंडळाच्या माध्यमातून विज्ञान विषयाची गोडी निर्माण केली. विज्ञान प्रदर्शनात सतत सातत्याने सहभाग घेतला. त्यांचे गणित विषयावर प्रभुत्व होते. सेवानिवृत्तीनिमित्त श्रीधर जाधव सरांचा सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सचिव डॉ सुरेशराव जाधव विश्वस्थ व देवस्थानचे चेअरमन मोहनराव जाधव तसेच पिंपरी चिंचवड पुणे चे सहा. पोलीस आयुक्त राम जाधव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सहा. पोलीस आयुक्त राम जाधव यांनी संस्थेच्या व प्राचार्यांच्या कार्याचे कौतुक केले व शाळेच्या विविध उपक्रमांना मदत करणार असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले. संस्था सचिव डॉ सुरेशराव जाधव यांनी आपल्या मनोगतात प्राचार्य श्रीधर जाधव यांनी कमी कालावधीत गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न स्मरणात राहतील असे विचार व्यक्त करुन सरांना सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रा जे. बी. जाधव, सुधाकर माने, अमृता वाघ यांनी मनोगते व्यक्त केली. प्राचार्य श्रीधर जाधव यांनी आपल्या मनोगतात संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथराव जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव डॉ सुरेशराव जाधव, विश्वस्त व सेवागिरी देवस्थानचे चेअरमन मोहनराव जाधव सर्व संस्था पदाधिकारी, पिंपरी चिंचवड पुणे चे सहायक पोलीस आयुक्त राम जाधव, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक तसेच ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. पर्यवेक्षक दिलीप काळे यांनी आभार मानले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |