02:31pm | Oct 22, 2022 |
नवी दिल्ली : यंदाची दिवाळीरोजगाराभिमुख असेल, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय.
केंद्र सरकारतर्फे 10 लाख तरुणांना रोजगार देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. रोजगार मेळावा असं याला म्हटलं जातंय. या अंतर्गत दिवाळीच्या सुरुवातीलाच आज 75,000 तरुणांना सरकारी नोकरीचं ऑफर लेटर देण्यात आलंय. ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधानांच्या हस्ते हे नियुक्तीचं पत्र देण्यात आलं.
यासह देशभरातील 50 केंद्रीय मंत्र्यांनीही विविध ठिकाणाहून 20 हजार लोकांना अपॉइंटमेंट लेटर दिलंय. सरकारी नोकऱ्यांसाठी निवड झालेल्या काही उमेदवारांना रोजगार मेळाव्याअंतर्गत नियोजित ठिकाणचं वैयक्तिक स्वरुपात अपॉइंटमेंट लेटर देण्यात आलंय.
सरकारनी नोकरीसाठी निवड झालेल्या काही उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मंत्र्यांद्वारे अपॉइंटमेंट लेटर देण्यात आलं. तर उर्वरीत उमेदवारांना ईमेल किंवा पोस्टाद्वारे ऑफर लेटर दिलं जाईल. तरुणांना ऑफर लेटर देतानाच पंतप्रधानांनी त्यांना उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
रोजगार मेळाव्याचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मागील आठ वर्षात देश रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या दिशेने वाटचाल करत आहे. या मालिकेत आज आणखी एक पाऊल टाकलं गेलं. रोजगार मेळाव्यात ७५ हजार तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आलं.
कुठे झाली ही भरती?
भारत सरकारच्या 38 मंत्रालयांतील विविध विभागांसाठी ही नोकर भरती झाली. ग्रुप अ आणि ब (गॅझेट), ग्रुप बी- (नॉन गॅझेट) आणि ग्रुप-सी कॅटेगरी अंतर्गत विविध मंत्रालयांमध्ये या तरुणांना नोकरी देण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र दल कर्मचारी, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, एलडीसी, स्टेनो, पीए, इनकम टॅक्स इन्स्पेक्टर, एमटीएससह विविध पोस्टवर ही नियुक्ती झाली आहे. भारत सरकारच्या विविध मंत्रालय व विभागांनी ही भरती प्रक्रिया केली आहे. यासह संघलोक सेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे भर्ती बोर्ड यासारख्या निवड एजन्सीजद्वारे या नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. पुढील दीड वर्षात याच मिशन मोडवर 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचा उद्देश असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |