03:55pm | Dec 17, 2020 |
वॉशिंग्टन: संपूर्ण जगाला वेठीस धरणार्या कोरोना संकटापासून बचाव करण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे मास्क सक्ती करण्यात आली आहे. परंतु आजही अनेक ठिकाण केवळ कारवाईपासून बचाव करण्यासाठी मास्क वापरला जात आहे. वारंवार एकच मास्क वापरणे धोकादायक ठरू शकते, अशा इशारा अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स विद्यापीठ आणि कॅलिफोर्नियाच्या बॅपटिस्ट विद्यापीठाच्या संशोधकांनी दिला आहे.
एकच मास्क वापरणे हे विनामास्क फिरण्यापेक्षा जास्त घातक असल्याचे मत संशोधकांनी मांडले आहे. मास्क लावल्यानंतर व्यक्तीच्या चेहर्याच्या आसपासच्या हवेचे वाहणेही बदलते. मास्क घातल्यानंतर केवळ नाक आणि तोंडाकडेच नाही तर मास्कच्या संपूर्ण पृष्ठभागावर हवा वाहते.अभ्यासात सहभागी झालेले असोसिएट प्रोफेसर डॉ. जिनझिआंग यांनी सांगितले की, सामान्यता जुना किंवा नवीन मास्क हा विनामास्क घालण्यापेक्षा खूप सुरक्षित असतो. मात्र, अभ्यासावेळी जेव्हा हवेमध्ये असलेल्या मोठ्या कणांसाठी मास्क वापरला तर माइक्रोमीटरपेक्षा कमी जाडीच्या कणांसाठी ही बाब चुकीची ठरते.
संशोधनात तीन लेअर असलेल्या सर्जिकल मास्कची तपासणी करण्यात आली. यावेळी हे मास्क नवीन असताना छोट्या आकाराच्या तीन चतुर्थांश कणांना रोखण्यात यशस्वी ठरतात. तर एकापेक्षा जास्त वेळा वापरले जाणारे मास्क हे एक चतुर्थांश कणांना रोखण्यात यशस्वी ठरले आहेत. याचाच अर्थ वापरलेल्या मास्कनी कमी कोरोना व्हायरस रोखले गेल्याचे अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स विद्यापीठ आणि कॅलिफोर्नियाच्या बॅपटिस्ट विद्यापीठाच्या संशोधकाच्या टीमने म्हटले आहे. मास्क प्रभावी आहेत की नाही यावर त्यांनी संशोधन केले आहे.
जेवढ्या अधिकवेळा ते मास्क वापरले जाते तेवढे ते खराब होत जात असल्याचे फिजिक्स ऑफ फ्ल्युइड र्जनलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात संशोधकांचे म्हणणे आहे.
अटक केलेल्या परप्रांतीय टोळीवर स्फोटक पदार्थ बाळगल्याचाही गुन्हा |
अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
वाळूचोरी प्रकरणी एकावर गुन्हा |
धामणेर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
पावणेपाच लाख रुपयांची फसवणूक |
गळफास घेतल्याने मुलीचा मृत्यू |
औंध पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल |
कान्हरवाडीच्या सरपंच, उपसरपंचासह सोळाजणांवर गुन्हा |
कोरोनाच्या प्रसारामुळे पुसेगाव येथील रविवारचा आठवडा बाजार रद्द |
वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेणारी जनता सहकारी बँक राज्यात पहिली |
काल निष्पन्न झालेल्या 119 कोरोनाबाधितांचा अहवाल |
डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ |
117 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
साताऱ्यातून दोन दुचाकींची चोरी |
पाचवड फाटा येथे अपघातात एक जखमी |
गळफास घेतल्याने मुलीचा मृत्यू |
औंध पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल |
कान्हरवाडीच्या सरपंच, उपसरपंचासह सोळाजणांवर गुन्हा |
कोरोनाच्या प्रसारामुळे पुसेगाव येथील रविवारचा आठवडा बाजार रद्द |
वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेणारी जनता सहकारी बँक राज्यात पहिली |
काल निष्पन्न झालेल्या 119 कोरोनाबाधितांचा अहवाल |
डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ |
117 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
साताऱ्यातून दोन दुचाकींची चोरी |
पाचवड फाटा येथे अपघातात एक जखमी |
महिलेने केले विषारी औषध प्राशन |
सुरूर उड्डाण पुलावरील अपघातात तिघांचा मृत्यू; एकजण गंभीर |
शेंद्रे येथील डॉक्टरचे केले खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर |
बनावट सोन्याचे अमिष दाखवून लुटणारी टोळी जेरबंद |
भाजप प्रदेश महिला मोर्चाचे सातार्यात चक्काजाम आंदोलन |