फलटण : 18 सप्टेंबर पासून 16 ऑक्टोबर पर्यंत अधिक महिना येत आहे, हिंदू पंचागा प्रमाणे हा महिना दर तीन वर्षानी येत असतो. अधिक मासाला पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असेही संबोधले जाते. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व असून, यंदा मात्र कोरोना विषाणू च्या पाश्वभूमिवर धार्मिक कार्यक्रमाला मर्यादा येनार आहेत समूह संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने आपल्याकडे अद्यापही मंदिरे खुली करण्यात आलेली नाहीत, त्यामुळे अधिक मास धार्मिक विधी करणाऱ्यांच्या व जावयाला वानस्वरूपात भेटवस्तू देण्याची प्रथा असल्यामुळे यंदा जावयांच्या आनंदावर विरजण पडणार आहे.
कोरोना महामारीने अख्ख्या देशाला वेढले आहे. मंदिरे बंद असल्यामुळे या वर्षीच्या धोंडा महिन्यात धार्मिक विधी पार पाडण्यावर बंधने आली आहेत. दरम्यान यामुळे नवीन लग्न झालेल्या जावयांच्या बरोबरच तिन वर्षात लग्न झालेल्या जावयांचा मात्र हिरमोड होणार आहे. तिन वर्षानी येणारा धोंडा आणि करोनाचा धोका हा योग या वर्षी जुळून आल्याने यंदा चा धोंडा म्हणजे दुष्काळ तेरावा महिना या म्हणी प्रमाणे चर्चेत राहणार आहे. कोरोनाच्या सावटामुळे नवीन जावयांना धोंडे जेवण्याचा योग येतो का नाही? याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. तसेच या महिन्याला विविध पौराणिक कथेचांचीही जोड दिली गेली आहे. या कालावधीत मध्ये शुभ कार्य केली जात नाहीत, परंतु दानधर्म करण्यासाठी हा महिना शूभ मानला जातो. नवविवाहित जावयांना पंचपक्वान्नाच्या जेवणावळीसह, नवीन कपडे, सुवर्ण मुद्रा, चांदीच्या वस्तू पासून ते महागड्या वस्तूंची भेटी दिल्या जातात परंतु या वर्षी मात्र जावायांचा हिरमोड होणार आहे. अगदी दोन दिवसावर धोंड्याचा महिना येवून ठेपला आहे, परंतु सुवर्णपेढी व बाजार पेठेवर याचा कुठल्याही प्रकारे परिणाम दिसून येत नाही. सुवर्ण पेढ्या व बाजारपेठामध्ये भेटवस्तूंची रेलचेल दिसून येते. यंदा मात्र कोरोना बरोबर अधिक मास आल्याने दुष्काळात तेरावा महिना आल्याचे बोलले जात आहे.
कोरोनात तेरावा महिना
तिन वर्षात लग्न झालेले व नवविवाहितांसाठी अधिकाचा महिना हा सुकाळ असतो, सासुरवाडी कडून जावयांना पंचपक्वान्नासह मानपानाबरोबरच कपडे व भेटवस्तू ही दिल्या जातात, परंतु धोंड्याचा महिना आणि कोरोना एकत्र आल्यामुळे जावयांच्या उत्साहावर विरजण पडले आहे, कोरोनामुळे जावयांसाठी धोंड्याचा महिना हा दुष्काळातल्या तेराव्या महिन्याप्रमाणे आला आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |