01:36pm | Jun 24, 2020 |
पाटणा : भारत, चीन आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातवारण आहे. त्यातच नेहमी संकटकाळात मदतीचा हात देणार्या भारताविरोधात नेपाळने आडमुठी भूमिका घेतली आहे. धक्कादायक म्हणजे नेपाळमध्ये कोणतेही संकट आले की नेपाळी नागरिक भारतात शरण घेतात. नेपाळने बंधार्याचे काम रोखल्याने गावांमध्ये तणावाचे वातावरण आहे. 2017 मध्ये आलेल्या पुरावेळी नेपाळी नागरिकांना आम्ही आमच्या वाट्याचे जेवण दिले होते. त्यांना वाचविले होते. याच बजरहा गावातील लोक आता नेपाळी पोलिसांसोबत मिळून भारतीय नागरिकांना मारहाण करत आहेत, असे बिहारच्या सीमेवरील एका नागरिकाने सांगितले.
दरम्यान, नेपाळच्या अडेतट्टूपणामुळे बिहारचा मोठा भाग महापुराच्या संकटात अडकणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीयश कुमार यांनी पुरापासून सुरक्षेसाठी लांबलेल्या योजनांना पूर्ण करण्यासाठी नेपाळच्या अधिकार्यांशी समन्वय साधण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
भारत नेपाळच्या सीमेवर पुराचे पाणी रोखण्यासाठी बंधारा बांधण्याचे काम नेपाळने थांबविले आहे. ललबकेया नदीवरील बंधार्याला नेपाळ सरकारने बंदी आणली आहे. पूर्वी चम्पारण जिल्हा मुख्यालयापासून 60 किमीवर याच नदीवर एका बांध आहे. तो इंग्रजांनी पूर रोखण्यासाठी बांधला होता. मात्र, 2017 मध्ये आलेल्या महापुरामुळे दोन्ही देशांदरम्यान वाद सुरु झाला आहे. हा बंधारा वेळोवेळी पुनर्निर्माण केला जात होता. मात्र नेपाळने हे काम रोखल्याने आता पुराचा धोका वाढला आहे.
हीरापूर गावाचे अब्दुल बारी यांनी सांगितले की, या बजरहा गावचे लोक बंधारा बांधण्यासाठी नेहमी तेथील अधिकार्यांशी वाद घालतात. मात्र, यंदा त्यांनीच आपली जागा असल्याचा दावा करून काम थांबविले आहे. जर या बंधार्यामुळे पाणी अडले तर नेपाळमध्ये पूर येईल अशी भीती तेथील प्रशासनाला वाटत आहे. नेपाळच्या बदललेल्या भुमिकेमुळे सीमाभागात तणावाचे वातावरण असल्याचे महताब आलम यांनी सांगितले. नेपाळच्या लोकांचा एवढा बदललेला स्वभाव आजपर्यंत पाहिला नाही. त्यांच्याशी रोटी-बेटीचे नाते होते, असे बलुआ गुआबारीचे प्रमुख अतिकुर्र रहमान यांनी सांगितले.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |