08:33pm | Apr 16, 2021 |
सातारा : जावली तालुक्यातील एका़ गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात पोक्सो अंतर्गत मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मेढा पोलिसांनी चार जणांना अटक करण्यात आली असून दोन जण फरार आहेत. या प्रकरणात जावलीच्या विद्यमान पंचायत समिती सदस्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, केडंबे (ता.जावली) येथील एक महिला जावली पंचायत समितीत विद्यमान सदस्या आहेत. त्यांचे पती, मुलगा, दीर तसेच गावातील अन्य तीन जणांनी गेल्या वर्षभरापासून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबाबतची घटना उघडकीस आली. त्यानंतर संबंधित मुलीच्या पालकांनी मेढा पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केल्यानंतर संशयितांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघांना तत्काळ अटक केली आहे. संबधित संशयितांनी सहा वर्षीय चिमुकलीला शेतात, राहत्या घरात, वैरणीच्या गंजी जवळील झोपडीत जीवे मारण्याची धमकी, तर कधी चॉकलेटचे आमिष दाखवून गेले एक वर्षभर अत्याचार केल्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबधित मुलीला संशयित खेळण्यासाठी व खाऊ देण्यासाठी घरातून बोलवून नेत होते. त्यानंतर निर्जनस्थळी अत्याचार करत असत. हा सर्व प्रकार लहान मुलीने आपल्या घरात सांगितल्यानंतर कुटुंबियांनी थेट मेढा पोलिस स्थानकात धाव घेतली आणि घटनाक्रम सांगितला. या संदर्भात अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने करत आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |