11:05pm | Jul 09, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे जनता भयभीत झाली असताना आज विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 48 नागरिकांना घरी सोडण्यात आल्याने भीतीचे ओझे हलके होण्यास मदत झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा कहरही वाढला असून काल रात्री जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 67 आणि आज दिवसभरात 51 रुग्ण असे 24 तासांत तब्बल 118 बाधित निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 1543 झाली आहे.
आज दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये जावली तालुक्यातील आखेगणी येथील 65 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय युवक, 40 वर्षीय महिला, बिरामणेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, बामणोली येथील 46 वर्षीय पुरुष, रामवाडी येथील 57, 42, 48, 43, 55 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील चौधरीवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, करंजखोप येथील 8 वर्षाची बालिका, जांभ खुर्द येथील 31 वर्षीय पुरुष, दुर्गळवाडी येथील 23 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील महारुगडेवाडी येथील 21 व 46 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, तारुख येथील 22, 54, 32, 35 वर्षीय महिला, 11 वर्षाचा बालक, 40 वर्षीय पुरुष, काळेवाडी येथील 8 वर्षाचा बालक, तुळसण येथील 60 वर्षीय पुरुष, गोळेश्वर येथील 46 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 47 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, मलकापूर येथील 1 पुरुष, येळगाव येथील 65 वर्षीय पुरुष, हिंगणोळे येथील 54 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 32 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील न्यू कॉलनी येथील 60 वर्षीय महिला, वाई तालुक्यातील धर्मपुरी येथील 35 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील दौलतनगर येथील 39 वर्षीय पुरुष, रेल्वे स्टेशन येथील 32 वर्षीय पुरुष, लिंब येथील 40 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील उरुल येथील 30 वर्षीय पुरुष, बोंद्री येथील 34 वर्षीय पुरुष, सांगवड येथील 31 वर्षीय पुरुष, फलटणच्या रविवार पेठेतील 68, 25, 62, 60 वर्षीय महिला, जिंती येथील 44 वर्षीय महिला, गुणवरे येथील 51 वर्षीय पुरुष, आंदरुड येथील 35 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील 22, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 71, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 57, फलटण ग्रामीण रुग्णालय येथील 20, कोरेगाव येथील 27, वाई येथील 40, शिरवळ येथील 92, रायगाव येथील 23, पानमळेवाडी येथील 42, मायणी येथील 9, महाबळेश्वर येथील 13, पाटण येथील 79, खावली येथील 28 अशा एकूण 523 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
दरम्यान, आरोग्य विभागाकडून काल रात्रीपासून जाहीर करण्यात आलेल्या 118 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून आजअखेर जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 1543 पर्यंत पोहोचला आहे. जिल्ह्यातील कोरोना बळींचा आकडाही वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |