06:15pm | Mar 01, 2021 |
कराड : जुन्या वादाच्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून कराड शहर पोलिस ठाण्यात बोलविण्यात आलेल्या एकाने दुसर्यावर अचानक चाकू हल्ला केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसमोर झालेल्या या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. लखन भागवत माने (वय 40) रा. हजारमाची (ता.कराड) असे या चाकू हल्ला करणार्याचे तर किशोर पांडुरंग शिखरे (वय 27) रा. हजारमाची (ता.कराड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, किशोर शिखरे याच्या वडिलांबरोर लखन माने याचे भांडण झाले होते. वारंवार समजावून सांगूनही लखन माने किशोरच्या वडिलांना फोनवरून धमकी देत होता. त्यामुळे याबाबत कराड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अधिक चौकशी करण्यासाठी दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले होते. कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी.आर. पाटील यांच्या केबिनमध्ये दोघे एकमेकासमोर आल्यानंतर अचानक हा प्रकार घडला.
कराड शहर पोलीस ठाण्यात पोलिस निरिक्षक बी.आर.पाटील यांच्या समोरच अचानक लखन माने याने किशोर शिखरे याच्या पाठ, मान व हातावर चाकूने तीन वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यातील वार शिखरे याच्या वर्मी लागल्याने तो जखमी झाला आहे. वेळीच पोलिसांनी त्याला थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी जखमी किशोर शिखरे याला तात्काळ त्याला उपचार उपचारासाठी रुग्णालयात हलवले. याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर लखन माने याला ताब्यात घेतले असून जखमीच्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |