11:25pm | Aug 07, 2020 |
सातारा : सातारा शहर परिसरात राहत्या घरांतून मोबाईल चोरी करणार्या अल्पवयीन युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) ताब्यात घेतले. संशयिताने तब्बल 35 मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली असुन पोलिसांनी ते मोबाईल जप्त केले.
सातारा शहरासह परिसरातील उपनगरातून गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले होते. नागरिक राहत्या घरात मोबाईल चार्जिंग करण्यासाठी खिडकीत ठेवतात. चोरटे हीच संधी साधत खिडकीतून सहज मोबाईल चोरी करतात. शहरातील वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनेने एलसीबीचे पथक त्याबाबत माहिती घेत होते. अशातच एलसीबीच्या पथकाला चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी एकजण वनवासवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा लावला असताना तेथे एकजण संशयास्पदरीत्या फिरत होता. पोलिसांनी त्याला हटकल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. संशयिताला ताब्यात घेतले असता त्याच्या प्लास्टिक पिशवी होती. पोलिसांनी पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये मोबाईल होते. सर्व मोबाईल मोजले असता 35 निघाले. मोबाईलबाबत पोलिसांनी विचारताच संशयिताने ते चोरी केले असल्याची कबुली दिली. संशयिताला नाव, पत्ता विचारला असता तो सातार्यातीलच असून अल्पवयीन आहे.
पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेवून मोबाईल जप्त केले. संशयिताचा जाबजबाब घेतला असता ते मोबाईल शिवराज पेट्रोल पंप परिसर, मयुरेश पार्क, सदरबझार, कृष्णानगर, कोडोली, गोडोली, पालवी चौक, चाहूर, मल्हार पेठ या ठिकाणी मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. यामध्ये वन प्लस वनचे 7, व्हिव्हो रेडमी, ओपो अशा महागड्या मोबाईलचा समावेश असून त्याची किंमत अंदाजे 1 लाख 75 हजार रुपये आहे.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, पोनि सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आनंदसिंह साबळे, पोलिस हवालदार ज्योतीराम बर्गे, सुधीर बनकर, विनोद गायकवाड, मोहन नाचन, संतोष जाधव, नितीन भोसले, राजकुमार ननावरे, गणेश कापरे, धिरज महाडीक, वैभव सावंत, मोहसीन मोमीन, संजय जाधव, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |