06:46pm | May 27, 2023 |
सातारा : अन्नप्रक्रिया कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग कौशल्य विकसित करण्यासाठी करावा आणि रोजगार निर्मिती करून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनावे. उद्योजकीय अवकाशात गरूडभरारी घ्यावी, असे मत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी व्यक्त केले.
येथील आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या फास्ट फूड स्टॉल उद्यमी या प्रशिक्षण वर्गाचा समारोप नुकताच संपन्न झाला.यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे समीर शेख बोलत होते. आरसेटीतर्फे संस्थेचे संचालक प्रशांत पाटील उपस्थित होते.
समीर शेख म्हणाले, उद्योग क्षेत्रात उतरण्यासाठी कौशल्य अत्यंत महत्त्वाची आहेत. नवउद्योजकांनी ती सतत आत्मसात करावी. व्यावसायिक ज्ञान मिळवून त्याचा वापर करत व्यवसाय समृद्ध करावा. आरसेटीतर्फे विविध क्षेत्रातील प्रशिक्षण मोफत दिले जाते. त्याचा जास्तीत जास्त तरुण वर्गाने लाभ घ्यावा. त्यातून स्वतःच्या आयुष्यात उंच भरारी घ्यावी.
प्रशांत पाटील यांनी संस्थेचे उद्दिष्ट व कार्य यांची माहिती दिली. सातारा जिल्ह्यातील तरुणांना उद्योजकियदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी आयडीबीआय आरसेटी सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली.
समीर शेख यांच्या संकल्पनेतील उंच भरारी या उपक्रमातील तरुणांनीही या प्रशिक्षणात सहभाग नोंदवला.
याप्रसंगी प्रशिक्षणार्थींनी आपले अनुभव कथन केले.
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे दिले जाणारे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास विषयतज्ज्ञ प्रशिक्षक प्रेमराज शिंदे, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
व्यवसायात भरारी घेऊ
या कार्यशाळेत बेकरी, फास्ट फूड, हॉटेल, घरगुती पदार्थ निर्मिती या व्यवसायातील महिला, मुली सहभागी होत्या. आम्हाला पदार्थ निर्मितीतील अत्यंत बारकावे या कार्यशाळेमुळे समजले. व्यवसाय उभारताना कोणते गुण अंगी असावे, याचे ज्ञानही मिळाले. हे प्रशिक्षण नक्कीच आम्हाला गरुडझेप घेण्यास मदत करेल, अशी भावना अस्मिता पाटील, अभिजित पाटील, हिना बागवान, प्रिया पवार, तेजस्विनी देशमुख आदींनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |