पुसेगाव: चिमणगाव (ता.कोरेगाव) येथील सुकन्या पूजा आनंदराव शिंदे हीची भारतीय हवाई दलात फ्लाईंग ऑफिसरपदी निवड झाली असून तिने प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन मिळवलेल्या अभुतपूर्व यशाबद्दल चिमणगाव ग्रामस्थांतर्फे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
सातारा येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातून बी.क़ॉम. करताना 22 महाराष्ट्र बटालियन एनसीसीची कॅडेट असलेल्या पूजाने 12 नंतर हवाईदलात अधिकारी होण्याचा निर्णय घेतला होता. बी.कॉम. करत असताना तीने एनसीसी, एनएसएस व युथ फेस्टीवल सारख्या विविध उपक्रमात सहभाग घेतला होता. अंतिम वर्षात शिकत असताना तीने एअर फोर्स नॉन टेकनिकल ग्राउंड ड्युटी अकाउंट्स ब्रांच अंतर्गत फ्लाईंग ऑफिसर पदासाठी अर्ज केला होता.
भारतीय वायुसेनेमार्फत फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या एएफसीएटी या परीक्षेमध्ये तिने यश संपादन केले असून मार्च 2020 मध्ये सर्विस सिलेक्शन बोर्डची मुलाखत यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर तिची डिसेंबर 2020 मध्ये अंतिम निवड झाली. सैन्य दलातील महिला अधिकारी पदावर निवड झालेली महाविद्यालयातील व बटालियनमधील ती पहिलीच महिला कॅडेट आहे. तिच्या या यशाबद्दल चिमणगाव येथे ग्रामस्थांनी चौकाचौकात पूजाच्या अभिनंदनाचे फलक लावून कौतुक केले.
चिमणगाव येथील विवेकानंद अॅकॅडमी ऑफ ह्युमन एक्सलन्स या सीबीएसई शाळेत तिचा शाळेच्या प्राचार्या रुपाली शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या शाळेतील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना तिने या परीक्षेची माहिती देऊन स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन केले. आईवडीलांनी शेतीत कष्ट करुन आपणास शिकविले. मुलाबाळांच्या कल्याणासाठी अपार कष्ट करणारे आईवडील हेच आपले प्रेरणास्थान आहेत. स्पर्धा परीक्षेतील यशासाठी एकाग्रता, मेहनत, वेळेचे नियोजन व प्राणाणिकपणा खूप महत्वाचा आहे. ग्रामीण, शहरी असा भेदभाव न करता सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन या क्षेत्रात उतरणार्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच तयारी करणे आवश्यक असल्याचे तीने यावेळी मार्गदर्शन करताना नमुद केले.
यावेळी नितीन पंडीत, तुषार महाजन, विजय माने, तेजस्विनी शिंदे, सीमा बर्गे, ज्योती सावंत, अफसाना मुल्ला, उर्मिला साळुंखे, सोनाली झांजुर्णे, अनुराधा कदम उपस्थित होते. रुपाली शहा यांनी प्रास्ताविक केले. विरेंद्र गायकवाड व निर्मला वाघ यांनी आभार मानले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |