07:49pm | Nov 19, 2022 |
सातारा : फलटण तालुक्याचे शेवटचे टोक असलेले तांबवे येथे आज दि.19 रोजी माढा लोकसभा मतदार संघाचे खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी विविध विकासकामांचा शुभारंभ तसेच केंद्रीय जलजीवन मिशन अंतर्गत तांबवे गावाला 71.89 लाखांचा निधी दिल्यामुळे तांबव्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
तांबवे, ता. फलटण येथे आज शनिवारी दि. 19 रोजी माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केंद्रीय जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल या केंद्राच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत तांबवे गावाला 71.89 लाख रुपयांचा निधी मंजूर करून तांबवे गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात काढला आहे. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचा शुभारंभ केला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका भाजप अध्यक्ष बजरंग गावडे, अमरसिंह नाईक- निंबाळकर, भाजपचे फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते, ताबंवेच्या सरपंच नीलम गायकवाड, जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष रामदास शिंदे, उद्योजक अंकुश जाधव, देविदास चव्हाण, आबा शिंदे उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर म्हणाले, फलटण तालुक्यातील पश्चिमेकडील भाग हा दुष्काळी भाग म्हणून पूर्वी ओळखला जात असे. धरण उशाला असले तरी लोकांच्या घशाला नेहमीच कोरड पडत असे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय जलजीवन मिशन अंतर्गत आत्तापर्यंत 10 कोटी 54 लाख 37 हजार 743 नळ कनेक्शन देशभरात दिले आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हर घर जल हे स्वप्न या निमित्ताने साकार झाले. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत ही कामे सुरू असून मी जनशक्ती मंत्रालय पार्लमेंटचा सदस्य असल्यामुळे जिल्हाभरात जलजीवन मिशनवर काम करणे सोपे जाते. याच माध्यमातून तांबवे येथे 71.89 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून आज त्यांचे भूमिपूजन झाले आहे. येणार्या काळात तांबवे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे निकाली निघणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |