11:52pm | Jul 29, 2020 |
सातारा : बुधवार सातारकरांसाठी धक्कादायक वार ठरला असून आज तब्बल नऊजणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याने सातारा जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नऊजणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 128 वर पोहोचली आहे. बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार 141 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3667 झाली आहे. तर जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरु असलेले 68 जण कोरोनातून ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
बुधवारी दिवसभरात कोरोनामुळे नऊजणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असतानाच रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील 141 जणांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत, तर 834 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरु असलेले 68 जण कोरोनातून ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला आहे. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे -
खंडाळा तालुक्यातील पळशी येथील 55 वर्षीय महिला., जावली तालुक्यातील दापवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, पुनवडी येथील 33, 75,75,54,28,50 वर्षीय महिला 19 वर्षीय तरुणी व 11,13,3 वर्षीय बालीका व 76, 56 वर्षीय पुरुष., सातारा तालुक्यातील सातारा येथील 31 वर्षीय पुरुष, तामजाई नगर येथील 30 वर्षीय पुरुष, विमल सिटी येथील 65,25,47 वर्षीय महिला, खावली येथील 30 वर्षीय पुरुष, कर्मवीर नगर खिंडवाडी येथील 37 वर्षीय महिला व 75 वर्षीय पुरुष., वाई तालुक्यातील शेंदुर्जणे येथील 30, 28 वर्षीय महिला 65, 48 वर्षीय पुरुष, 4 वर्षीय बालीका, 13,12 वर्षीय बालक, सायगांव येथील 64 वर्षीय महलिा, बोपेगांव येथील 35 वर्षीय पुरुष., खटाव तालुक्यातील खटाव येथील 50 वर्षीय महिला, डिस्कळ येथील 58, 59 वर्षीय महिला., कराड तालुक्यातील सैदापूर येथील 50 वर्षीय पुरुष 20 वर्षीय महिला, मलकापूर येथील 40,43 वर्षीय पुरुष, मिरगाव येथील 35 वर्षीय पुरुष, वराडे येथील 45 वर्षीय महिला, वनवासमाची येथील 60 वर्षीय पुरुष, चिखलेवाडी येथील 17 वर्षीय युवक., पाटण तालुक्यातील पाटण येथील 53 वर्षीय पुरुष, कासणी येथील 53 वर्षीय पुरुष., महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील 2 वर्षाची बालीका, 22,25,46,20 व 50 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष., फलटण येथील लक्ष्मीनगर येथील 42,49,45 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला व 19 वर्षीय तरुणी, वारेवस्ती खामगांव येथील 62,24,52,25,22,70,26 वर्षीय पुरुष व 55,45,20 वर्षीय महिला, साखरवाडी येथील 50 वर्षीय महिला., माण तालुक्यातील दहिवडी येथील 65 वर्षीय पुरुष.
834 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 22, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 81, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 35, कोरेगांव येथील 5, वाई येथील 121,खंडाळा 75, रायगाव 61, पानमळेवाडी 115, मायणी 49, महाबळेश्वर 20, दहिवडी 14, खावली येथे 132 व कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 104 असे एकूण 834 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराउ येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
उपचारा दरम्यान 9 जणांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथे रेठरे बु. ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष, सायगांव ता. जावली येथील 70 वर्षीय पुरुष व वाठार ता. कोरेगांव येथील 64 वर्षीय पुरुष या तीन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच सातारा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये गुरुवार पेठ कराड येथील 36 वर्षीय पुरुष व भुतेघर ता. जावली येथील 53 वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल कोविड बाधित आला आहे. दरम्यान, रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार चारजणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असून बुधवारी दिवसभरातील कोरोनाबळींची संख्या 9 झाली असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |