कराड : चालू वर्ष आंतरराष्ट्रीय वन वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. निसर्ग हे वन्यजीवांचे अद्भुत विश्व असून निसर्ग हीच खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील अद्वितीय शाळा आहे, असे मत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत यांनी व्यक्त केले.
आगाशिवनगर (मलकापूर), ता. कराड येथे जागतिक वन दिनानिमित्त आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास प्रक्षेत्र भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांनी येथे वन व वन्यजीव विभागाची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
वनसंरक्षक सुरेश साळुंखे म्हणाले, जमिनीचा पोत सुधारण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वने करत असतात. तसेच परिसरातील जैविक विविधता व समृद्धता हे सुद्धा निसर्गाचे अविभाज्य अंग आहे. तर वनक्षेत्रपाल शिशुपाल पवार यांनी सांगितले, निसर्ग ही देवाने दिलेली उपयुक्त अशी सुंदर देणगी आहे. त्यामुळे तिचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वस्वी आपली असून विद्यार्थ्यांना वृक्षारोपण व जलसंवर्धन करण्याचे आव्हानही त्यांनी यावेळी केले.
वनक्षेत्रपाल सुरेश लाखे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री व्याघ्र प्रकल्प भवनाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी वनसंरक्षण व वन संवर्धनाचे धडे घेतले. याप्रसंगी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी वनरक्षक वनक्षेत्रपाल सुभाष बागडी, तुषार ढमढेरे, गणेश पाटसुते, ज्ञानेश्वर राक्षे, नंदकुमार नलवडे, बाळकृष्ण हसबनीस, संदीप जोपाळे, संदीप कुंभार यांनी झाडांना आपण सोयरे...वनचरे...मानतो ना? मग, त्यांची काळजी घेऊन भावी पिढ्यांच्या सुख: समृद्धीसाठी वृक्ष, पशुपक्षी व वनांच्या संवर्धनाची जबाबदारी सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन केले.
व्याघ्रप्रकल्पाच्या प्रांगणामध्ये असलेल्या विविध वन्यजीवांच्या प्रतिकृतींनी विद्यार्थ्यांची मने जिंकली. प्रबोधन विषयक जैवविविधता, निसर्ग व पर्यावरण पूरक पोस्टरमधून विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण माहिती आत्मसात केली. विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देऊन खाऊवाटप करण्यात आले.
यावेळी आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन शिंदे, रफिक सुतार, रंजना कांबळे, अश्विनी पाटील, नंदा पानवळ, शबाना मुल्ला, वैभव शिर्के, रूपाली कुंभार, जयमाला पाटील, अश्विनी यादव, अश्विनी देसाई वासंती जगताप, संग्राम काकडे व विद्यार्थी उपस्थित होते.
निसर्ग मानव जातीचा अविभाज्य भाग असून निसर्ग हा मानव जातीसाठी एक महान असा आशीर्वाद आहे. तेंव्हा विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने विद्यार्थ्यांना प्रक्षेत्र भेटीची संधी उपलब्ध करून दिल्याने सोपान जगताप यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानून क्षेत्रभेटीचा समारोप केला. संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, संचालिका डॉ. स्वाती मॅडम व पालकांनी विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |