01:07pm | Oct 07, 2020 |
नवी दिल्ली: नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबत सुप्रीम कोर्टाने आज मोठा निर्णय दिला. विरोध दर्शवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे किंवा रस्ते अडवून धरले जाऊ शकत नाहीत. अधिकार्यांनी अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्यास रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तत्काळ खुली करण्याची कारवाई केली पाहिजे. कोणताही विरोध किंवा आंदोलन हे निश्चित केलेल्या जागांवरच व्हायला हवेत. आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी केलेला विरोध किंवा ती जागा अडवून धरणे हा जनतेच्या हक्कांचे हनन आहे आणि कायदा याला परवानगी देत नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
त्याचबरोबर कोणताही सार्वजनिक मार्ग अनिश्चित काळासाठी रोखून धरला जाऊ शकत नाही. शाहीन बागेत मध्यस्थीचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, मात्र आम्हाला त्याचा पश्चाताप नाही. कोणतीही आंदोलने ही ठरवून दिलेल्या जागेतच व्हायला हवेत. भारताची राज्यघटना विरोध करण्याचा अधिकार देते, मात्र त्यासोबत कर्तव्याचे पालन देखील केले गेले पाहिजे याकडे सुप्रीम कोर्टाने लक्ष वेधले आहे.
कोणीही व्यक्ती किंवा समूह सार्वजनिक स्थान अडवू शकत नाही असे या प्रकरणी आपला निकाल देताना सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाणी अनिश्चितकाळ कब्जा केला जाऊ शकत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. धरणे किंवा आंदोलन करण्याचा हक्क ही वेगळी गोष्ट आहे, मात्र इंग्रजांच्या राज्यात ज्या प्रकारे विरोध केला जात होता, तसे आता करणे योग्य ठरणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मोठ्या संख्येने लोक गोळा झाले होते. शाहीन बागेतील रस्ता आंदोलनकर्त्यांनी अडवून धरलेला होता, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने या प्रकरणी वेगवेगळे निकाल दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणांवर आणि रस्त्यांवर अनिश्चित काळासाठी कब्जा केला जाऊ शकत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |