01:05pm | Sep 24, 2021 |
केळघर : जावली तालुका मेढा येथील नागरी भागातील निवासी, औद्योगिक, वाणिज्य या अकृषिक आकारणीचे चालु बाजार मुल्याप्रमाणे, प्रति चौरस मिटर दर हे सर्व सामान्यांसाठी अन्यायकारक आहेत. ते शासनाच्या वतीने कमी करण्यात यावेत या मागणीचे निवेदन जावलीचे तहसिलदार यांना माजी आ. सदाभाऊ सपकाळ, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती अमितदादा कदम यांचे नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मागणीचे निवेदन दिले आहे.
मेढा नागरी भागातील निवासी, औद्योगिक, वाणिज्य या अकृषिक आकारणीचे चालु बाजार मुल्याप्रमाणे दि.२४ मे २०१६ ते दि.३१ जुलै २०१६ व दि. १ ऑगस्ट २०१६ ते ३१ जुलै २०२१ या कालावधी साठी निश्चित केलेले, प्रति चौरस मिटर दर हे सर्व सामान्यांसाठी अन्यायकारक आहेत, ते शासनाच्या वतीने कमी करण्यात यावेत या मागणीचे निवेदन जावलीचे तहसिलदार यांना देण्यात आले. तहसिलदार यांचे वतीने हे निवेदन नायब तहसिलदार अमोल सलगारे यांनी स्विकारले.
मार्च २०२० पासून राज्यात आणि देशात कोविड सारख्या महाभयंकर आजाराने थैमान घातले असताना, त्यातच चालु वर्षी झालेली ढगफुटीची अतिवृष्टी यामुळे व्यावसायीकांबरोबरच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. समाजाची आर्थिक घडी खिळखिळीत झाली असताना, शासनाने सन २०१६ पासून (मागील ७ वर्षापासून) अकृषिक आकारणी केलेली रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले असल्याने कोविडच्या महामारीत हा सर्वसामान्यांच्यावर आर्थिक हालच आहे. समाजाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता शासनने मागील ७ वर्षाची वसुली न करता चालू आकारणी प्रमाणेच चालू वर्षाची वसुली करावी, तसेच अन्य तालुक्यापेक्षा मेढा नागरी क्षेत्रासाठी लागु केलेली आकारणी ही अन्यायकारक असून तीही कमी करुन मिळावी, अशी विनंती शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या प्रसंगी माजी आमदार सदाशिवभाऊ सपकाळ, माजी जि. प. शिक्षण सभापती आमितदादा कदम, शिवसेनेचे क्षेत्रप्रमुख एस्.एस्.पार्टे,(गुरूजी) वेण्णामाईचे अध्यक्ष सुरेश पार्टे, माजी सरपंच नारायणराव शिंगटे, माजी उपसरपंच प्रकाश कदम, माजी शिवसेना तालुकाप्रमुख संजय सुर्वे, विद्यार्थी सेनेचे सचिन करंजेकर, सचिन जवळ, राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष इम्रान आतार, अरूण जवळ, मोहन देशमुख आदी मान्यवर उपस्थीत होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |