09:25pm | Jul 08, 2020 |
सातारा : कोरोनाच्या बाबतीत आजचा दिवस सातारा जिल्ह्यासाठी 'कही खुशी कही गम' असा राहिला. कारण जिल्ह्यात आज सकाळपासून कोरोनाचे तब्बल ७४ रूग्ण वाढले, तिघांचा मृत्यू झाला, तर २७ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. पाहतापाहता जिल्ह्यातील बाधितांचा आकडा १४९९ पर्यंत पोहोचला असून कोरोना बळींची संख्या ६१ वर जावून पोहोचली आहे. एकूण बाधितांपैकी ८८६ जण कोरोनामुक्त झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे.
प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये निकट सहवासित ३९, प्रवास करुन आलेले ४, सारीचे व आयएलआय ३ याप्रमाणे रूग्ण आहेत. कोरोना बाधितांमध्ये पाटण तालुक्यातील गोकुळ येथील २९ वर्षीय महिला, कोयनानगर येथील ४५, ४८, ६० वर्षीय पुरुष, कामरगाव येथील ४० वर्षीय पुरुष, दबाचामाळ येथील १४ वर्षीय युवक, कडवे बुद्रुक येथील ३५ वर्षीय पुरुष, सडा दाढोली येथील ८५ वर्षीय महिला, माण तालुक्यातील म्हसवड येथील ५३ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, १६ वर्षीय युवती, दोरगेवाडी येथील २२, ५५ वर्षीय महिला व १३ व १९ वर्षीय युवती, ४० वर्षीय पुरुष, इंजबाव येथील २८ वर्षीय पुरुष, मार्डी येथील ४२ वर्षीय महिला, गोंदवले बुद्रुक येथील ४० वर्षीय पुरुष व ३७ वर्षीय महिला, कराड तालुक्यातील तारुख येथील ४८ वर्षीय पुरुष, कोरिवळे येथील ३० वर्षीय महिला, तारुख येथील २६ वर्षीय महिला, शामगाव येथील ४९ वर्षीय पुरुष, सुपने येथील २८ वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील जिहे येथील ७ वर्षाचा बालक, खावली येथील ५२ वर्षीय पुरुष, जिहे येथील ५० वर्षीय पुरुष, ७० व ८५ वर्षीय महिला, भरतगाव येथील ४८ वर्षीय पुरुष, गोजेगाव येथील ३४ वर्षीय पुरुष, कण्हेर येथील ३२ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर, सातारा येथील ४५ वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ, सातारा येथील ३० वर्षीय महिला, वाई तालुक्यातील केंजळ येथील २३, ४८, २७ वर्षीय पुरुष व ४८, ७०, २५ वर्षीय महिला, पसरणी येथील ३० व ५२, ४४ वर्षीय महिला, जावली तालुक्यातील पुणवडी येथील ६० वर्षीय पुरुष, कास येथील ३८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. याशिवाय आज सायंकाळी आणखी ७ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला असून त्यामध्ये सातारा तालुक्यातील चोरगेवाडी येथील ६१ वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील पळशी येथील ५० वर्षीय पुरुष, शिरवळ येथील २७ महिला, फलटण तालुक्यातील जाधववाडी येथील १२ वर्षीय मुलगी, फरांदवाडी येथील ३६ वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील फडतरवाडी येथील ४७ वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील ३५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. दरम्यान आज रात्री उशिरा निष्पन्न झालेल्या ६७ कोरोना बाधितांचा तपशील अद्याप प्राप्त झाला नसल्याचे, जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या २७ नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील २० वर्षीय महिला, कराड तालुक्यातील चचेगाव येथील ४५ वर्षीय महिला व २० वर्षीय पुरुष, चचेगाव येथील ४५ वर्षीय पुरुष, खंडोबानगर, मलकापूर येथील ८ वर्षीय बालक, ३० वर्षीय महिला, जावली तालुक्यातील रामवाडी येथील ४८ व ३० वर्षीय महिला, २२ वर्षीय पुरुष व ५ वर्षाचा बालक, वाई तालुक्यातील बावधन येथील ५७ वर्षीय पुरुष व ४४ वर्षीय महिला, पसरणी येथील ३७ वर्षीय महिला, कवठे येथील ३५ वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील नागठाणे येथील ५३ वर्षीय पुरुष, सातारा येथील २६ वर्षीय पुरुष, वडूथ येथील ६३ वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील शेंडेवाडी (कुंभारगाव) २० वर्षीय महिला, १८ वर्षीय युवक, पालेकरवाडी येथील ६५ वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरुष, फलटण (रविवार पेठ) येथील ४५ व २७ वर्षीय महिला, ९, ६ व ४ वर्षीय बालिका व ७ वर्षाचा बालक यांचा समावेश आहे.
दरम्यान, सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे जावली तालुक्यातील कुसुंबी येथील ३५ वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे पाटण तालुक्यातील शितपवाडी येथील ६४ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असलेल्या जावली तालुक्यातील पुनवडी येथील ६० वर्षीय पुरुषाचा काल दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान घेण्यात आलेला नमुना कोरोना बाधित आला आहे.
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |