03:11pm | Jul 17, 2020 |
विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशातील तिरूपती बालाजी मंदिरातील कोरोना बाधितांचा आकडा वाढू लागला आहे. सर्व सुरक्षा व्यवस्था असतानाही कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकड्याने मंदिर काही दिवस बंद ठेवण्याची मागणी सुरू झाली आहे. मात्र या परिस्थितीतही मंदिर ट्रस्ट सध्या दर्शनावर बंदी घालण्याचा विचार करत नसल्याची माहिती सामोर येत आहे.
कोरोनाचा कहर संपूर्ण देशात वाढत चालला असून आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात आतापर्यंत ट्रस्टचे 100 हून अधिक कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. 14 पुजार्यांसह जवळपास 140 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
दि. 8 जून रोजी अनलॉक 1 अंतर्गत मंदिर उघडण्यात आले होते. 11 जूनपासून सर्वसामान्यांसाठी दर्शन सुरू झाले. मात्र, 13 जूनपासून मंदिरातील कर्मचार्यांमध्ये कोरोना पसरण्यास सुरुवात झाली. तिरुपती शहरातील 36 भाग कंटेन्मेंट झोन होते. 6 हजारांपासून सुरू झालेली भाविकांची संख्या 15 हजारांपर्यंत पोहचली होती, परंतु मंदिरात कोरोना प्रादुर्भाव पाहत ही संख्या कमी होत आहे. सध्या मंदिरात दररोज 8 ते 9 हजार भाविक दर्शनासाठी येत आहेत.
मंदिराचे 12 कर्मचारी आणि 14 पुजारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मंदिर बंद करण्याची मागणी पुन्हा करण्यात येत आहे. गुरुवारी कर्मचारी संघटनेने देखील ट्रस्टकडे मंदीर बंद करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून इतर कर्मचारी आणि पुजार्यांना कोरोना होण्यापासून वाचवता येईल. राज्याचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनीही परिस्थिती आणखी बिकट होण्यापूर्वी आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी आंध्र सरकारकडे केली आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बरेड्डी म्हणतात की, सध्या मंदिरातील परिस्थिती नियंत्रणात आहे, म्हणून मंदिर पुन्हा बंद करण्याचे कोणतेही औचित्य नाही. पॉझिटिव्ह कर्मचार्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |