12:38pm | Sep 30, 2020 |
फलटण: धनगर आरक्षण प्रश्नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततेच्या मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दि.1 ऑक्टोंबर रोजी निवेदन देण्यात येणार आहे. नुकतीच माळशिरस येथे झालेल्या धनगर कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
माळशिरस बैठकीतील निर्णयानुसार दि.1आक्टोंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी खालीलप्रमाणे शांततेने निवेदन देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले असून त्याचबरोबर आगामी काळात राज्यातील प्रमुख नेते मंडळी प्रामुख्याने खा. शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची कृती समितीच्या नेत्यांनी वेळ घेऊन धनगर प्रश्न सोडविण्यासाठी आग्रह धरण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले. मराठा समाजाच्या आरक्षणा बरोबरच धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य कार्यवाही तातडीने करणेबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला असल्याचे पै. बजरंग गावडे यांनी सांगितले.
माळशिरस, जि. सोलापूर येथे धनगर आरक्षण कृती समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारीणी बैठक दि.25 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. या बैठकीत धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी तात्काळ होणे करिता दिशा ठरविणेसाठी सविस्तर चर्चा करण्यात आली असून या चर्चेनुसार आगामी काळामध्ये या निवेदनामध्ये धनगर समाजाची आर्थिक, राजकीय, शैक्षणीक व सामाजिक परिस्थिती अत्यंत हलाखीची व बिकट झालेली असून यामधून धनगर समाजाची सर्वांगीण प्रगती होणेसाठी केंद्र व राज्य शासनाने योग्य समन्वयातून या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करीत महाराष्ट्र शासन आरक्षण यादीत धनगर समाजाचा आदिवासी मध्ये समावेश करण्यात आला आहे, तथापी त्यामध्ये धनगर ऐवजी धनगड असा उल्लेख झाल्यामुळे समाजाला आरक्षणाचे फायदे मिळू शकत नाहीत, सदर दुरुस्ती करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी 1) महाराष्ट्र आदिवासी यादीमध्ये अनुक्रमांक 36 वर धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती केंद्र शासनाने करावी याबाबतची शिफारस करण्यात यावी, 2) केंद्र शासनाने या दुरुस्तीचे बिल तयार करुन संसदेमध्ये मंजूर करुन घ्यावे, किंवा संसदेत सादर झालेल्या 325 क्रमांकाच्या बीलामध्ये ही दुरुस्ती टाकून बिल मंजूर करावे, किंवा या दुरुस्ती बाबतचा राष्ट्रपती यांचे मान्यतेने अध्यादेश त्वरित काढण्यात यावा अशी मागणी तमाम धनगर समाजाच्या वतीने करण्यात येत असल्याचे दि. 1 ऑक्टोबरच्या निवेदनात स्पष्ट करण्यात यावे, आणि सदर निवेदन जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी आपल्या शिफारशीसह कृपया, मुख्यमंत्री यांना सादर करावे, अशी विनंती त्यांना करण्यात यावी असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे पै. बजरंग गावडे, पै. बजरंग खटके यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समितीच्या माध्यमातून माळशिरस येथील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्याच माध्यमातून तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन वरीलप्रमाणे मागणीची निवेदने देण्यात येणार असल्याचे पै. बजरंग गावडे यांनी सांगितले.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |