पुसेगाव: कोविड साथीचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने गेले वर्षभर घातलेल्या निर्बंधामुळे केटरर्स व्यवसाय पुर्णतः संकटात आला असून यावर उपजिवीका करणार्या केटरर्स व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी प्रशासनाने केटरर्स व्यावसायिकांच्या अडचणी सोडवाव्यात, कोविड सुरक्षितते बाबतच्या सर्व अटींचे पालन करुन संघटना प्रशासनाला सहकार्य करेल, अशी ग्वाही सातारा जिल्हा केटरर्स असोशिएशनचे अध्यक्ष निरज गायकवाड यांनी दिली.
येथील छत्रपती शिवाजी चौकातील हॉटेल राजपुरोहीत अँड बालाजी केटरर्स येथे खटाव व माण तालुक्यातील केटरर्स व्यावसायिकांची नुकतीच बैठक झाली. विवाह व अन्य समारंभात प्रशासनाने आणलेल्या निर्बंधामुळे केटरर्स व्यवसायात आलेल्या समस्यांवर चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. गायकवाड यांनी संघटनेची उद्दिष्टे व संघटनेतर्फे होणार्या नवनवीन उपक्रमांची माहिती दिली.
संघटनेचे कार्याध्यक्ष संजय देशपांडे म्हणाले, इतर व्यवसायांप्रमाणे शासन व प्रशासनाने कार्यालयांच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना उपस्थितीस परवानगी द्यावी. सर्व कार्यक्रम प्रसंगी केटरर्स लोकांनी व तेथे काम करणार्या अन्य लोकांनी स्वच्छता, मास्क व सॅनिटायजरचा वापर करावा तसेच सोशलडिस्टन्सींगचा काटेकोरपणे अवलंब करावा असे आवाहन केले. नारायणशेठ राजपुरोहीत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सातारा जिल्हा केटरर्स असोसिएशनचे अमोल शिंदे, दत्तात्रय जाधव,रमेश पाटील,खेमसिंग महाराज, कुंदन पवार,महेश माने, खटाव-माण संघटनेचे नारायण महाराज, अर्जून माळी, मोहन चव्हाण, अनिल बाबर, महेंद्र विधाते, लक्ष्मण बाबर व भोलेनाथ खराडे उपस्थित होते. महेश माने यांनी आभार मानले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |