11:52am | Feb 24, 2021 |
पुसेगाव : येथील श्री सेवागिरी विद्यालयातील काल सहा विद्यार्थी तर आज १४ विद्यार्थी पॉझिटीव्ह सापडल्यामुळे पालकांच्यात भीती व्यक्त होत आहे. दरम्यान शाळा किती दिवस बंद राहील, याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीच्या दि २७ रोजी होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार आहे.
आलेल्या कोरोना अहवालानुसार शाळेतील १४ मुले मुली कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात वेटने तीन, नेर एक, पुसेगाव पाच, काटकरवाडी एक, रेवलवाडी एक, बुध दोन तर विसापूर येथील एका विद्यार्थ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत सध्या सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांवर विश्वास न ठेवता पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत अधिक दक्षता घ्यावी असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या चौगुले यांनी केले आहे.
दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीची बैठक शनिवारी दि २७ रोजी पुन्हा होणार असून त्यात शाळा कधी पुन्हा चालू करायची याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून इ. पाचवी पासूनचे वर्ग शासनाने सुरु केले, वास्तविक पाहता लहान मुलांना कोरोना बाबतीत काय आणि कशी काळजी घ्याची याचे भान नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे काही पालकांचे मत आहे.
श्री सेवागिरी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती संध्या चौगुले, पर्यवेक्षक प्रवीण घाटगे सर्व शिक्षकांनी वेळीच शाळा बंदचा घेतलेला निर्णय सार्थकी ठरला असून पुसेगाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. जर शाळा गेल्या पाच दिवसापासून बंद नसती तर या भागात कोरोनाने हाहाकार माजवला असता. सध्या या शाळेतील कोरोना बाधित मुलांच्या संपर्कात आलेल्या सर्व ग्रामस्थांनी कोरोनाबाबत योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्याध्यापिका चौगुले यांनी केले आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |