11:30am | Oct 18, 2021 |
वाई : येथील महागणपती घाटावर परप्रांतीय तरुणावर दोन्ही हातात तलवारी घेऊन ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी व शहरातील सहा मद्य विक्रीच्या दुकानात तोडफोड करून दहशतीने दुकाने बंद केल्याप्रकरणी अजय गोपी घाडगे यास पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, रविवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास अजय गोपी घाडगे याने दोन्ही हातात तलवारी घेऊन शहरातील मध्यवस्तीतील मद्यविक्रीच्या दुकानात जाऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. दुकान चालकांना दमदाटी करून, तोडफोड करत दुकाने बंद करण्यास भाग पाडले. यानंतर महत्वाच्या किसन वीर चौकात असणाऱ्या वाईन शॉप मध्ये घुसून तेथील फर्निचरची व काचांची मोडतोड केली. दुकानात दहशत माजवत ग्राहकांना बाहेर काढले व दुकान बंद करण्याची धमकी दिली. यानंतर घाडगे याने शहरातील महागणपती घाटावर पाणीपुरी हातगाडी चालविणाऱ्या परप्रांतीय तरुणावर हातातील तलवारीने ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला. त्याने वार चुकविण्यासाठी हात समोर धरल्याने झटापटीत पाणीपुरी हातगाडी चालकाची बोटे तुटली. त्याने पळत जाऊन एका दुकानाचा आश्रय घेतल्यामुळे तो वाचला. झटापटीत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक कृष्णकांत पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे व पोलिस कर्मचाऱ्यांनी जाऊन अजय गोपी घाडगे (वय २३, रा. लाखा नगर, वाई) यास महागणपती पुलालगत ताब्यात घेतले. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी रिंकू मुंनीलाल ठाकूर या पाणीपुरी गाडा चालकाने तक्रार दिली आहे. याशिवाय सागर अशोक फरांदे, केदार रमेश गायकवाड, फैय्याज नासिर खान, किरण दामोदर कांबळे, सतीश बाळासाहेब कांबळे या मद्यविक्रेत्यांनी तक्रार दिली आहे. या प्रकारामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात दिवसभर गर्दी होती. सायंकाळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या दालनात व्यापाऱ्यांची बैठक सुरु होती. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकांत पवार करत आहेत.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |