सातारा : शहरात अनधिकृत बांधकाम असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सातारा पालिकेच्या वतीने त्याबाबत संबंधितांना नोटीस बजावल्यानंतरही बांधकाम हटवले नसल्याने एकूण दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, सातारा पालिकेच्या या पावित्र्याने बेकायदा बांधकाम व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
उज्ज्वल कुमार गोविंदराव राठी (रा. सातारा) यांच्या विरुध्द पालिकेचे भाग निरीक्षक श्रीकांत गोडसे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, सिटी सर्वे नंबर 497 (अ92) या मिळकतीमध्ये राठी यांनी या जागेवर बेकायदेशीर बांधकाम व बेकायदेशीर व्यवसायिक वापर बंद करण्यास बजावले होते. मात्र राठी यांनी ऐकले नाही. नोटीसेचे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरुध्द तक्रार देण्यात आली आहे.
दुसरी तक्रार विपुल विनोदराव शहा व शिवाजी वसंत भोसले (रा. दोघे रा. सदरबझार, सातारा) यांच्या विरुध्द सातारा नगर पालिकेचे भाग निरीक्षक श्रीकांत गोडसे यांनी दिली आहे. सदर बझारमधील सिटी सर्व्हे नं. 499/2 या मिळकतीमध्ये अनधिकृत बांधकाम हटवण्याबाबत पालिकेच्यावतीने संशयितांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, नोटीस दिल्यानंतरही त्यांनी पत्रा शेडचे बांधकाम हटवले नाही. शहा व भोसले यांनी महाराष्ट्र प्रादेशिक अधिनियमाचे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |