12:39pm | Mar 05, 2021 |
पुसेगाव: चिमणगाव (ता.कोरेगाव) येथील विवेकानंद अॅकॅडमीत आर्टिफिशियल इंटीलिजन्स, रोबोटीक्स, थ्रीडी प्रिंटर, मशिन लर्निंग, डीप लर्निंग सारखे आधुनिक शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी या शाळेने टेस्ला स्टेम अँड रोबोटीक्स इनोव्हेशन प्रयोगशाळेची निर्मिती केली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणारे व इंजिनीअरींगचा पाया असणारे ज्ञान यामुळे शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
भादिले (जि.कोल्हापूर) येथील श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा केंद्राचे अध्यक्ष स्वामी सेवानंद महाराज यांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान दिनी या लॅबचे उदघाटन करण्यात आले. सारदादेवी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक शंकरराव काटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला काटकर, शशीधर शास्त्री, मुंबई येथील नेक्टर एज्युसिस व स्टेम लॅबचे निर्मिती प्रमुख प्रा.अमोल यादव, कार्यकारी अभियंता डॉ. सुरेंद्रकुमार काटकर, अर्चना देशमुख, पंकज गोंदकर, शाळेच्या प्राचार्या रुपाली शहा, डॉ.रविंद काटकर, आदिती काटकर, अरुण जाधव, संजय चव्हाण, उपस्थित होते.
आपले ध्येय साध्य करण्यासाठी आधुनिक शिक्षणाची कास धरुन विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करावेत, असे आवाहन स्वामी सेवानंद महाराज यांनी केले. डॉ.सुरेंद्रकुमार काटकर म्हणाले, इंडिया टुडेच्या अहवालानुसार आवश्यक असणारे कौशल्य नसल्यामुळे भारतातील 93 टक्के इंजिनीअर्स नोकरीसाठी अपात्र ठरतात. भारतीय शिक्षण पद्दती व औद्योगीक क्षेत्र यातील गॅप भरुन काढण्यासाठी केंद्रातील मोदी शासनाने शालेय स्तरावर अटल टिंकर लॅबचा उपक्रम सुरु केला. या लॅबच्या निर्मितीसाठी सात हजार शाळांना प्रत्येकी 20 लाखांचा निधी दिला. पण त्यासाठी प्रशिक्षकांची निर्मिती मात्र केली नाही. चिमणगाव येथील विवेकानंद अॅकॅडमी येथे शाळेतून बाहेर पडणारे विद्यार्थी जागतीक स्पर्धेला समर्थपणे सामोरे जावेत, ते ज्ञानाने व तंत्रज्ञानाने परीपुर्ण घडावेत म्हणून संस्था चालकांनी स्वखर्चाने या लॅबची निर्मिती केली. तर येथील सर्व शिक्षकांनी केवळ तीन महिन्यात त्यासाठी लागणारे प्रशिक्षण व तंत्रज्ञान आत्मसात केले. विद्यार्थी व शिक्षकांनी पाच रोबो तयार केले. थ्रीडी प्रींटरद्वारे विविध वस्तूंची निर्मिती केली. मोबाईल गेमचे अॅप तयार करुन विविध कौशल्ये प्राप्त केली.
लॅबचे निर्मिती प्रमुख प्रा.अमोल यादव म्हणाले, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटीक्स, ऑर्डिनो बोर्ड, सेन्सर, मोबाईल गेम अॅप, कोडींग या आधुनिक शिक्षणात लॉजिकल व नालॉटीकल थिंकींग बरोबरच स्टेम एज्युकेशनची आवश्यकता आहे. स्टेम म्हणजेच सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरींग व मॅथ्सचा वापर करुन विविध उपकरणांची निर्मिती करणे. कोरोना कालावधीत उपयोगात येणारे थर्मामीटर, ऑक्सीमीटर सारखी उपकरणे हा स्टेमचाच अविष्कार असून त्यात विविध प्रकारची सेन्सर्स उपयोगात आली आहेत. औद्योगीकरणात रोबोटीक्सचा वापर झपाट्याने वाढत आहे. अमेरिका, जर्मनी, जपान व चीन सारखे देश या तंत्राचा वापर अनेक वर्षांपासून करत आहेत.
देशाच्या नव्या शैक्षणिक धोरणात स्टेम एज्युकेशनचा समावेश लवकरच होणार आहे. विवेकानंद अॅकॅडमीत आता हे शिक्षण उपलब्ध झाले आहे. मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी विद्यार्थ्यांनी स्टेम एज्युकेशनचा अवलंब करुन त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्हींगचे कौशल्य आत्मसात करावे असे आवाहन त्यांनी केले. सीमा घाडगे यांनी स्वागत केले. अफसाना मुल्ला व अनुराधा कदम यांनी सूत्रसंचालन केले. निर्मला वाघ यांनी आभार मानले.
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |