01:02pm | Nov 24, 2022 |
सातारा : येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने 'भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' या विषय सूत्रावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेची तयारी पूर्ण झाली असून महात्मा फुले स्मृतीदिनी २८ नोव्हेंबर रोजी उद्घाटनाचे पहिले पुष्प महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रख्यात इतिहासतज्ञ डॉ.राजा दीक्षित गुंफणार आहेत.
प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांच्या 'राजगृह' निवासस्थानी झालेल्या बैठकीत व्याख्यानमाला व मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन निश्चित करण्यात आलेआहे,अशी माहिती अध्यक्ष दिनकर झिंब्रे व उपाध्यक्ष रमेश इंजे यांनी दिली. नगरवाचनालयाच्या पाठक हाॅल मध्ये रोज सायंकाळी सहा वाजता ही व्याख्यानमाला होणार आहे. डॉ.राजा दीक्षित,पुणे ' महात्मा फुले व सत्यशोधक समाज ' या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत.
मंगळवारी २९ नोव्हेंबरला दैनिक लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक, विचारवंत संजय आवटे ' माध्यमांच्या कोलाहलाचंही जागतिकीकरण ' या विषयावर बोलणार आहेत. बुधवारी ३० नोव्हेंबरला राज्यशास्त्राचे अभ्यासक,धनंजयराव गाडगीळ काॅलेजचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे ' भारतीय संविधानाची वाटचाल ' याची मांडणी करणार आहेत. गुरुवारी १ डिसेंबरला सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासक डॉ. चैत्रा रेडकर, पुणे ' महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाच्या चळवळी ' वर बोलणार आहेत.
शुक्रवारी २ डिसेंबर रोजी प्रसिद्ध राजकीय विश्लेषक, शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश पवार 'भारतीय राष्ट्रवाद: काल,आज, उद्या ' या विषयावर बोलणार आहेत. शनिवारी ३ डिसेंबरला भारतीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक, राजकीय विश्लेषक दैनिक सकाळचे संचालक व मुख्य संपादक श्रीराम पवार ' भारतीय लोकशाहीची वाटचाल' या विषयाची मांडणी करणार आहेत. रविवारी ४ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मातोश्री भिमाबाई आंबेडकर २४ वा पुरस्कार विंचवाचं तेल आत्मकथनाच्या लेखिका सुनीता भोसले यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञ, विचारवंत लेखक डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
मंगळवार दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांस उपस्थित रहावे असे आवाहन संबोधी प्रतिष्ठानचे ज्येष्ठ विश्वस्त प्राचार्य आण्णासाहेब होवाळे, कार्यवाह ॲड. हौसेराव धुमाळ, सहकार्यवाह अनील बनसोडे, कोषाध्यक्ष केशवराव कदम, विश्वस्त प्राचार्य डॉ. संजय कांबळे, डॉ. सुवर्णा यादव, प्रा. प्रशांत साळवे, प्रकाश गायकवाड व यशपाल बनसोडे यांनी केले आहे.
युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले संशयित 36 तासात रत्नागिरी येथून जेरबंद |
गर तू मेरा नही हो सका, तो किसी और का होने नहीं दूंगी... |
वाढे फाटा येथील मारेकरी ताब्यात; सूत्रधार कोण? |
दोन लाखांचे दागिने घेऊन कारागीर पळाला |
एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |
खानापूरच्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून; वाई तालुक्यात खळबळ |
तांब्याच्या तारेची चोरी |
नोकरीच्या आमिषाने तब्बल चार लाख 99 हजाराची फसवणूक |
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल |
मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प |