09:33pm | Sep 23, 2022 |
सातारा : आपल्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बांधकाम कामगार महासंघाने सातारा येथे आंदोलन करून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, बांधकाम कामगारांना पूर्वी अवजारे खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपये मिळत होते. शासनाने ही योजना बंद केलेली आहे त्यामुळे कामगारांना अवजारे खरेदी करता येत नाहीत. अवजारे खरेदी करण्यासाठीची असणारी योजना पूर्ववत सुरू करावी. बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यामध्ये खूप विलंब होत आहे त्यामुळे नोंदणी आणि नूतनीकरणाची कामे त्वरित करण्यात यावीत त्यामुळे कामगारांना बाकी योजनांचे लाभ मिळण्यास लागणार नाही. बांधकाम कामगारांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, आजारपणाचे लाभ, स्वतःच्या किंवा स्वतःच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळणारे लाभ आणि बांधकाम कामगाराचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या पश्चात मिळणारा लाभ याला खूप विलंब होत आहे. कामगारांना वेळेवर पैसे मिळत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. संबंधित मिळणारे लाभ त्वरित देण्याची व्यवस्था करावी. सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा किमान पाच हजार रुपये पेन्शन सुरू करावी, बांधकाम कामगारांना कार्ड घेण्यासाठी स्वतः यावे लागते त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. संघटनेमार्फत ज्यांची नोंदणी किंवा नूतनीकरण झालेले आहे अशा सर्व कामगारांची कार्ड आमच्या अधिकृत प्रतिनिधीकडे देण्यात यावीत. कोरोना काळामध्ये महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांना मदत म्हणून काही रक्कम दिली होती. मात्र त्याचा लाभ अनेक सभासदांना मिळालेला नाही. कामगारांना दिवाळीनिमित्त दहा हजार रुपये एवढा बोनस देण्यात यावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत निवेदनावर जिल्हा चिटणीस विनोद केंजळे यांची स्वाक्षरी आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |