03:50pm | Feb 27, 2021 |
सातारा: बनावट सोन्याचे अमिष दाखवून सोने घेण्यासाठी येणार्यांना लुटणार्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून याच टोळीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.
जिल्हा मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अजयकुमार बन्सल पुढे म्हणाले, पेरले फाटा (ता.कराड) येथे बनावट सोने विक्रीसाठी काही परप्रांतीय येत असल्याची माहिती मिळताच त्या अनुषंगाने घटनास्थळी जाताना पो.कॉ.मुकेश मोरे यांच्यावर शुक़्रवारी रात्री उंब्रज (ता.कराड) गावच्या हद्दीतील जानाई पेट्रोल पंपाजवळ या टोळीने हल्ला केला होता. त्यात ते जखमी झाले. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह सातारा, कराड आणि पाटण पोलिसांचे संयुक्त पथक स्थापन करत त्या टोळीचा छडा लावण्याचे आदेश देण्यात आले होते. संबंधित पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. रात्रभर परिसरातील उसाच्या शेतात शोध घेतला असता आठ जणांची टोळी पोलिसांच्या हाती लागली.
राजा रेणू आदीवासी (वय 24), अंजर गजातलाल आदिवासी (वय 23), आसत सोनी आदिवासी, मुबारक बंदिलाल राजपुत (वय 20), दद्दा रेणू आदिवासी (वय20), करोसण बंदिलाल आदिवासी राजपूत (वय 26), बंदीलाल भदोसलाल आदिवासी (वय 40), खलिस्ते भुरा आदिवासी (वय40) सर्व रा.कटणी (मध्यप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, ही टोळी बनावट सोन्याचे अमिष दाखवून ते सोने खरेदी करण्यासाठी येणार्यांना लुटत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यांच्या विरोधात संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तपासामध्ये आणखी कोठे कोठे अशा प्रकारचे गुन्हे या टोळीने केले आहेत. याबाबतची माहिती पोलिस घेत आहेत. या टोळीने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या पो.कॉ. मुकेश मोरे यांनी पोलिसांना वेळीच कल्पना दिली असती तर त्यांच्यासमवेत आणखी काही पोलिस दिले असते त्यामुळे मारहाणीची घटना टळली असती असे सांगून अजयकुमार बन्सल पुढे म्हणाले, मुकेश मोरे यांची प्रकृती आता स्थिर आहे.
वाई येथील गांजाप्रकरणी तपासामध्ये काय प्रगती आहे, असे विचारले असता ते म्हणाले, या प्रकरणातील घरमालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे तपास सुरू आहे. अशा प्रकरणांचा तपास गुंतागुंतीचा असल्यामुळे तो पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या प्रकरणात अटक केलेल्या दोन आरोपींनी कारागृहात केलेल्या गैरवर्तनाबाबत त्या दोघांच्यावर 353 कलमान्वये शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रतापसिंहनगर येथील कोम्बिंग ऑपरेशनबाबत विचारले असता अशा पध्दतीचे ऑपरेशन हे रूटीनचे काम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊनबाबत त्यांना छेडले असता लॉकडाऊन कोणालाच नको आहे. त्यामुळे प्रत्येकाने सॅनिटायझर, मास्क आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जुगार अड्ड्यावरील कारवाई सर्वात मोठी
चार दिवसांपूर्वीच शाहुपूरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असणार्या जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या पथकाने केलेली कारवाई सर्वात मोठी आहे. अशा प्रकारची कारवाई करून आंचल दलाल यांनी खूप चांगले काम केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |