केळघर : महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष यांच्या सुचेनुसार व जावळी तालुकाध्यक्ष एस. ए.सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जावळी तालुका संघटनेचे सरचिटणीस डी. एन. आंबवणे व कार्याध्यक्ष एस. व्ही. ढाकणे यांच्या नेतुत्वाखाली मेढा येथील तहसील कार्यालयासमोर तालुका तलाठी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले, तसेच निदर्शनेही करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांना पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्या बदलीसाठी आज मेढा येथील तहसील कार्यालयासमोर तालुका तलाठी संघटनेच्यावतीने एक दिवसीय आंदोलन करून काम बंद ठेवण्यात आले. रामदास जगताप यांची यावेळी तातडीने बदली झाली नाही तर 13 ऑक्टोंबर पासून काम बंद आंदोलनाचा इशारा त्यांनी तहसीलदार राजेंद्र पोळ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
या आंदोलनामध्ये माजी उपाध्यक्ष आर. बी. जाधव, मंडल अधिकारी प्रतिनिधी ए. आर. शेख, एस. व्ही. मुळीक, सल्लागार पी. डी. गाढवे, महिला प्रतिनिधी पी. आर. पराड, उपाध्यक्ष एम. पी. सुतार व संगीता माने इतर पदाधिकारी व सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे सरचिटणीस डी. एन. आंबवणे म्हणाले, प्रशासनाने व शासनाने याची तातडीने दखल घ्यावी, आम्ही दिलेल्या निवेदनाची कार्यवाही व्हावी अन्यथा निवेदनात दिल्याप्रमाणे येत्या १३ ऑक्टोंबर पासून सर्व तलाठ्यांचे काम बंद ठेवण्यात येईल.
कार्याध्यक्ष एस. व्ही. ढाकणे यांनीही निवेदनाची शासनाने दखल घेवून कारवाई करण्याची मागणी केली व आंदोलना साठी उपस्थित असलेल्या संघटनेच्या सर्व सभासदांचे कार्याध्यक्ष एस व्ही ढाकणे यांनी आभार मानले.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |