08:35pm | Jan 19, 2023 |
सातारा : महाबळेश्वर येथे दिनांक 10 जानेवारी रोजी घरफोडीचा गुन्हा घडला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने वेगवान तपास करून तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रवीण चंद्रकांत घाडगे राहणार एरंडोल तालुका महाबळेश्वर सध्या राहणार संगम नगर सातारा, अनिकेत वसंत पाटणकर चंदन नगर कोडोली, आकाश ज्ञानेश्वर कापले दत्तनगर कोडोली या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणाची माहिती अशी, चोरट्यांनी दोन लाख 29 हजार रुपये किमतीचे पॉलीकॅब वायर कटर मशीन, ड्रिल मशीन, ॲल्युमिनियम व प्लंबिंग साहित्य चोरून नेले होते. त्यानुसार महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शना अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी तपास गतिमान केला. देवकर यांना 19 जानेवारी रोजी बातमीदारामार्फत संबंधित आरोपी देगाव फाटा येथे आले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने देगाव फाटा येथे जाऊन दोन इसमांना पिकअप व्हॅन सह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पॉलीकॅब वायर कटर मशीन, ड्रिल मशीन, ॲल्युमिनियम व प्लंबिंग साहित्य इत्यादी साहित्य ताब्यात घेण्यात आले. चोरी केलेला माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा मिळून 5 लाख 66 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप भागवत करत आहेत.
या कारवाईमध्ये संतोष पवार, रविंद्र मोरे, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, उत्तम दबडे, तानाजी माने, आदेश घाडगे, संजय शेडगे, विजय कांबळे, विश्वनाथ सपकाळ, अजित कर्णे, प्रवीण कांबळे, शिवाजी भिसे, स्वप्निल माने, अमोल माने, प्रवीण पवार, केतन शिंदे यांनी सहभाग घेतला.
युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले संशयित 36 तासात रत्नागिरी येथून जेरबंद |
गर तू मेरा नही हो सका, तो किसी और का होने नहीं दूंगी... |
वाढे फाटा येथील मारेकरी ताब्यात; सूत्रधार कोण? |
दोन लाखांचे दागिने घेऊन कारागीर पळाला |
एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |

खानापूरच्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून; वाई तालुक्यात खळबळ |
तांब्याच्या तारेची चोरी |
नोकरीच्या आमिषाने तब्बल चार लाख 99 हजाराची फसवणूक |
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल |
मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प |