09:29pm | May 26, 2022 |
पुसेगाव : खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्या राजापूर येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी माजी पंचायत समितीचे सदस्य जयवंतराव महादेव डंगारे तर व्हाईस चेअरमनपदी दादा मारूती लवंगारे योची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडणूकीत माजी सरपंच राजेंद्र राजेघाटगे बापू यांच्या नेतृत्वाखालील श्री जानुबाई शेतकरी विकास पॅनेलने 13 -0 जागा जिंकून 40 वर्षाची सत्ता अबाधित ठेवली. तर विरोधी माजी सरपंच हणमंत घनवट गुरुजी व दशरथ घनवट गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली श्री जानुबाई परिवर्तन विकास पॅनेलला आपले खातेही उघडता आले नाही. या निवडणुकीच्या रिंगणात दोन्ही पॅनेलचे मिळून 26 उमेदवार रिंगणात होते.
श्री जानुबाई शेतकरी विकास पॅनेलचे 40 वर्षे सोसायटीवर वर्चस्व असून याही वेळी सोसायटीवर आपले वर्चस्व कायम ठेवण्यात त्यांना यश आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी विजया बाबर यांच्या अध्यक्षतेखाली नुतन संचालकांची बैठक झाली यावेळी अरविंद बबनराव घाटगे, किसन नथुराम घनवट., दत्तात्रय दामू घनवट, बाळकृष्ण काशिनाथ घनवट, विकास तुळशिराम घनवट, शंकर नामदेव घनवट, जयवंत महादेव डंगारे, सिताराम संपत मदने, जयश्री कुंडलिक घनवट, नंदा बाबासो घनवट, सुधीर कांतीलाल घनवट, विकास विलास मदने, दादा मारुती लवंगारे हे नवनिर्वाचीत संचालक उपस्थित होते. यामध्ये चेअरमनपदी जयवंतराव डंगारे तर व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक विजया बाबर व सचिव संदिप घनवट यांनी काम पाहिले.
यावेळी माजी सरपंच राजेंद्र घाटगे बापू, रामदास डंगारे, नारायण घनवट, शिवाजी घनवट, संपत मदने, नागेश घनवट, भाऊसाहेब घनवट, हिरालाल पवार, महिपतराव डंगारे, काकासाहेब डंगारे, नितीन घनवट, बबन घनवट सर, रंगोबा मदने, दगडू बुधावले, जिजाबा घनवट, रामचंद्र घनवट बापू, तानाजी मदने, रमेश सुर्यवंशी, ’ तानाजी जाधव, संपत घनवट, संजय घनवट, किसन मदने, अमृत घनवट, नितीन घनवट उपस्थित होते. चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घार्गे, आमदार शशिकांत शिंदे, लेखा व कोषागरेचे संचालक वैभव राजेघाटगे, धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप,राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कॉंग्रेसचे रणजितसिंह देशमुख, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष मोहनराव जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी घाडगे, माजी सरपंच बाळासाहेब इंगळे, जिल्हा परिषद सदस्या सुनिता कचरे, कृषी उत्पन बाजार समितीचे माजी उपसभापती महेंद्र नलवडे, सरपंच वनिता पवार, उपसरपंच रविंद्र घनवट, युवानेते अमित जगताप, नितीन नलवडे व ग्रामस्थानी अभिनंदन केले.
फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी आजच होणार |
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु |
शुक्रवार १ जुलै २०२२ पासून लागू होणार ११ नवे नियम |
मृत कन्हैय्या लालच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 24 तासांत 1 कोटीचा निधी |
उद्धव ठाकरे च्याविषयी जनमानसात सहानुभूतीची एक प्रचंड लाट |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
जिल्ह्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण |
शेतकऱ्यांनी अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करावी : राहुल जितकर |
भाजपच्या महिला व युवक संपर्क प्रमुखांची पनवेल येथे बैठक संपन्न |
किर्लोस्कर पॉवर टिलर्सच्या माध्यमातून शेतीमध्ये घडवून आणत आहे क्रांती |
मलकापूर नगरपंचायतीतील निधी अपहार प्रकरणाची होणार चौकशी |