03:16pm | Oct 27, 2022 |
सिडनी : सूर्यकुमार यादवने नेदरलँड्सच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. पण त्याचबरोबर सूर्याने आता एक इतिहास रचला आहे. कारण सूर्याने या सामन्यात जे काही केले ते आतापर्यंत कोणालाही जमलेले नाही.पहिल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सूर्याला अपयशी ठरला होता. त्याला फक्त १५ धावा करता आल्या होत्या. पण या सामन्यात मात्र सूर्याने सर्व कसर भरून काढली. कारण सूर्याने या सामन्यात तुफानी फटकेबाजी तर केलीच, पण त्याचबरोबर आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला जे जेमले नाही ते सूर्याने करून दाखवले आहे.
सूर्यकुमारने यावेळी अखेरच्या चेंडूवर आपले अर्धशतक साजरे केले. पण हे अर्धशतक झळकावण्यापूर्वी त्याने एक नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. यावर्षी झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये सूर्या चांगल्या फॉर्मात होता. पण त्याच्यापेक्षा जास्त धावा या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानच्या नावावर होत्या. पण सूर्याने या सामन्यात धडाकेबाज फटकेबाजी केली आणि आपल्या नावावर हा विश्वविक्रम करत इतिहास रचला आहे. कारण आता या वर्षातील ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा या सूर्याच्या नावावर आता जमा झाल्या आहेत. त्याचबरोबर सूर्या आता चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे या वर्षात सूर्या या यादीत अव्वल राहील, अशी आशा चाहत्यांना आहे.
रोहित शर्माने या सामन्यात पहिले अर्धशतक झळकावले. पण त्याच्याकडून यावेळी तीन चुका घडल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने मैदानात आल्यावर काही काळ सेट व्हायला घेतला. पण त्यावेळी रोहितने आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केली. पण त्याच्याकडून यावेळी तन मोठ्या चुका घडल्याचे पाहायला मिळाले.
रोहित शर्माकडून पहिली चूक घडली ती पाचव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर. रोहितने या चेंडूवर पुलचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण हा फटका त्याचा चुकला. कारण यावेळी त्याला फटक्याचे योग्य टायमिंग जमले नाही. त्यामुळे हा चेंडू हवेत उडाला, पण त्याला जीवदान मिळाले. त्यानंतरच्या सहाव्या षटकात पुन्हा एकदा रोहित शर्माकडून मोठी चूक झाल्याचे पाहायला मिळाले. कारण या सहाव्या चेंडूच्या चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा रोहित लेगसाईडला मोठा फटका मारण्यासाठी गेला. पण यावेळी त्याचा झेल उडाला. रोहितला त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा जीवदान मिळाले. त्यानंतर तिसऱ्यांदा तर पंचांनी त्याला बाद दिले होते, पण रोहितने रीव्ह्यू घेतला आणि त्यामध्ये तो नाबाद ठरला. या तीन चुकांनंतर रोहितने आपले अर्धशतक मात्र साजरे केले. पण अर्धशतक झळकावल्यावर मात्र त्याला जास्त काळ खेळपट्टीवर उभे राहता आते नाही, त्याने ५३ धावा केल्या.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |