ट्युनिशिया : जी. साथियन आणि हरमीत देसाई या भारतीय जोडीने ट्युनिशिया येथे झालेल्या डब्ल्यूटीटी कंटेंडर ट्युनिस आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यांनी पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत इमॅन्युएल लेबेसन आणि अलेक्झांड्रे कॅसिन जोडीवर मात करत एकत्र खेळताना पहिल्या आंतरराष्ट्रीय जेतेपदावर नाव कोरले.
साथियन-हरमीत जोडीने लेबेसन-कॅसिन या फ्रेंच जोडीवर ११-९, ४-११, ११-९, ११-६ अशी मात केली. भारतीय जोडीने पहिल्या गेममध्ये निसटता विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये निराशाजनक खेळ केला. मात्र त्यांना योग्य वेळी कामगिरीत सुधारणा करण्यात यश आले. त्यांनी तिसरा आणि चौथा असे सलग दोन गेम जिंकत सामन्यात बाजी मारली.
‘‘पुरुष दुहेरीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची ही माझी वैयक्तिक पहिलीच वेळ होती. तसेच हरमीतसोबत खेळतानाही आमचे हे पहिले जेतेपद ठरले. आम्ही दीर्घ कालावधीनंतर एकत्र खेळत आहोत. त्यामुळे सुरुवातीलाच सुवर्णपदक पटकावणे ही समाधानकारक बाब आहे,’’ असे साथियन म्हणाला. तसेच त्याने या यशाचे श्रेय त्याचा साथीदार हरमीतला दिले. साथियन-हरमीतने उपांत्य फेरीत पिछाडीवर पडल्यानंतरही हंगेरीच्या नॅन्दोर एसेकी आणि अॅडम झुडी जोडीला पराभूत केले होते.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |