10:54pm | Oct 18, 2020 |
सातारा : रविवारी जिल्ह्यात 8 बाधितांचा मृत्यू, तर 145 बाधित निष्पन्न झाले. तसेच 181 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 57 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
रविवारी जिल्ह्यातील 8 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 1 हजार 430 वर पोहोचली आहे. तसेच 145 बाधित निष्पन्न झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 43 हजार 656 वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 181 नागरिकांना कोरोनातून ठणठणीत बरे झाल्याने घरी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 36 हजार 397 वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 5 हजार 499 रुग्णांवर उपचार सुरु असून 57 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
8 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या वाढे ता. सातारा येथील 69 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये बोराटवाडी ता. माण येथील 46 वर्षीय पुरुष, गोडोली ता. सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, कराड येथील 63 वर्षीय पुरुष, पाटण येथील 75 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले गुरुवार पेठ ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, कराड येथील 70 वर्षीय पुरुष, गणेश मंदिर वाढे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 8 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
57 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 23, पानमळेवाडी येथील 1, फलटण येथे 20, मायणी येथे 4, पिंपोडा 9 असे एकूण 57 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |