पुसेगाव: येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावच्या कार्यकारी विश्वस्त मंडळाची आज सभा संपन्न झाली. यावेळी डॉ. सुरेशराव जाधव यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. डॉ. सुरेशराव जाधव यांनी संस्थेच्या सचिवपदी गेल्या 25 वर्षात संस्थेस शैक्षणिक, क्रिडा तसेच समाजोपयोगी उपक्रमात आपल्या नेतृत्वगुणांनी जिल्ह्यात वैभव प्राप्त करून दिले.
जांब, रणसिंगवाडी येथील हायस्कूल तसेच पुसेगाव येथील श्री हनुमानगिरी प्राथ.शाळा, डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल सुरु करून दर्जेदार शिक्षण देण्यास सुरवात केली. श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव येथे गुरुकूल सेमी इंग्रजीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. जांब, जाखणगाव, पुसेगाव, राजापूर, रणसिंगवाडी येथील प्रशस्त शालेय इमारती व मैदाने ग्रामस्थांच्या सहकार्याने उभ्या केल्या. गुणवत्तेबरोबर संस्काराची जपणूक करणारे डॉ. सुरेशराव जाधव विविध शाखांमध्ये यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांचे भरभरून मदत करताना योग्य ते सहकार्य संस्था पदाधिकार्यांच्या मदतीने करत आले आहेत. स्वतः उच्चशिक्षित असल्याने त्यांच्या शिक्षणाचा व अनुभवाचा संस्थेच्या गौरवात भर घालणारा ठरेल असे विचार नूतन सचिव व श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव पाटील यांनी व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे नूतन सचिव मोहनराव रघुनाथराव जाधव पाटील यांचा देखील शैक्षणिक व सामाजिक कार्याचा अनुभव मोठा असून त्यांच्या विचारांचा व अनुभवाच्या शिदोरीचा फायदा संस्थेच्या व संस्थेच्या विविध शाखांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निश्चित होईल असे विचार नूतन अध्यक्ष डॉ. सुरेशराव सर्जेराव जाधव यांनी मांडून त्यांना शुभेच्छा दिल्या. नविन कार्यकारणीत उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब जाधव तर खजिनदारपदी लक्ष्मणराव महादेव जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी संस्था सदस्यांमधून सुर्यकांत राजाराम जाधव ऊर्फ एस.आर.पाटील यांची निवड करण्यात आली. सभेस तत्कालीन संस्था अध्यक्ष विश्वनाथ सखाराम जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, नूतन अध्यक्ष डॉ.सुरेशराव जाधव, तत्कालीन खजीनदार डॉ.सुभाष आगाशे, विश्वस्त विलासराव जगन्नाथ जाधव, नूतन सचिव व श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव रघुनाथराव जाधव, विश्वस्त कॅप्टन विष्णू कृष्णा खटावकर, नूतन खजिनदार लक्ष्मण महादेव जाधव, विश्वस्त योगेशराव देशमुख, नूतन विश्वस्त सुर्यकांत राजाराम जाधव उपस्थित होते.
नवीन संस्था कार्यकारणीचे विविध शाखांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक तसेच विविध स्तरावरील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |