01:13pm | Mar 31, 2022 |
नवी दिल्ली : विविध पक्षांचे ७२ राज्यसभा खासदार आज निवृत्त होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खासदारांना निरोप देताना भावुक उद्गार काढले आहेत. 'या खासदारांच्या निवृत्तीने आम्हाला अनुभवी साथीदारांची कमतरता जाणवेल. काही वेळा शैक्षणिक ज्ञानापेक्षा अनुभवामध्ये जास्त शक्ती असते. खरंतर हा निरोप देण्याचा समारंभ आहे. मात्र, आमची इच्छा आहे की, तुम्ही पुन्हा खासदार म्हणून या सभागृहात परत यावं,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
'आपण बराच काळ या संसदेत घालवला आहे. या सदनाला आपण जेवढं योगदान दिलं आहे, त्यापेक्षा जास्त योगदान या सदनाने आपल्या आयुष्यात योगदान दिलं आहे. या सभागृहाचा सदस्य म्हणून मिळालेला अनुभव आपण देशाच्या प्रगतीसाठी वापरला पाहिजे, 'असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी निवृत्त होत असलेल्या खासदारांना केलं आहे.
राज्यसभेच्या १३ जागांसाठी मतदान
एकीकडे राज्यसभेतील ७२ खासदार निवृत्त होत असताना दुसरीकडे राज्यसभेच्या १३ जागांसाठी आज मतदानही होत आहे. पंजाब, केरळ, आसाम, हिमाचल प्रदेश, नागालँड आणि त्रिपुरा या सहा राज्यातील १३ जागांसाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार, याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या २४५ जागांपैकी सध्या ९७ जागांवर भाजपचं वर्चस्व असून ही संख्या वाढवण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडून प्रयत्न केले जात आहेत, तर विरोधी पक्षांनीही भाजपला रोखण्यासाठी रणनीती आखली आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |