09:34pm | Jan 21, 2021 |
सातारा : कृष्णानगर येथे खून झालेल्या जया गणेश पाटील (गायकवाड) यांचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे समोर आले असून याप्रकरणी पोलिसांनी आनंद दाजी पेडणेकर (वय 32, रा.संभाजीनगर, सातारा. मूळ रा.चंदगड, कोल्हापूर) याला अटक केली. संशयिताला जया पाटील या घरी राहण्यासाठी दबाव टाकत होत्या व तसे न केल्यास बदनामीची धमकी देत होत्या. या कारणातून चिडून जावून संशयिताने खून केला. दरम्यान, ही कारवाई सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) पथकाने केली.
येथील शिवतेज हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी माहिती दिली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती अशी, जया पाटील या एकट्याच घरी राहत होत्या. शनिवारी दि. 16 रोजी सकाळी त्या रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याचे समोर आल्यानंतर परिसर अक्षरश: हादरुन केला. क्रूर पध्दतीने वार झाल्याने भितीचे वातावरण निर्माण झालेले होते. खूनाची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी धाव घेवून घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छदेनासाठी पाठवल्यानंतर त्यांचा गळा धारदार शस्त्राने कापल्याचे समोर आले. या व्यतिरीक्त कुठेही जखमा झाली नसल्याचे समोर आले आहे. घटनास्थळावरुन इतर सोने, दागिने, पैशांचीही चोरी झालेली नसल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता वृध्द महिलेचा मोबाईल चोरी झाला असल्याचे स्पष्ट झाले.
सुरुवातीला पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर पोलिसांना नेमका धागादोरा लागत नव्हता. एलसीबीनेही तपासाला सुरुवात केली. परिसरात राहणार्यांसह कुटुंबियांकडे चौकशीला सुरुवात झाली. याशिवाय पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात केल्यानंतर प्रत्येक धागादोरा तपासण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी अनेकांचे जाबजबाब घेत चौकशीची प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र सहाव्या दिवसापर्यंतही पोलिस अंतिम निष्कर्षापर्यंत पोहचलेले नाहीत.
अखेर पोलिसांनी तांत्रिक तपासावर फोकस केल्यानंतर त्यांच्या हाती धागेदोरे मिळाले. त्यावरुन पोलिसांनी संशयित आनंद पेडणेकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने खूनाची कबुली दिली. संशयित पोलिसांना दिलेली माहिती अशी, गेल्या काही महिन्यांपूर्वी जया पाटील व त्याची प्रवासात ओळख झाली. या ओळखीतून त्यांना एकमेकांना फोन नंबर दिले. त्यातून त्यांच्या भेटीगाठी झाल्या व पुढे अनैतिक संबंध झाले. या घटनेनंतर जया पाटील यांनी आनंद पेडणेकर याला त्यांच्याकडेच घरी राहण्याचा तगादा लावला. या मागणीमुळे आनंद वैतागला होता. त्याने नकार दिल्यानंतर जया पाटील यांनी त्याला बदनामी करण्याची धमकी दिली. या सर्व प्रकाराला कंटाळल्याने आनंद पेडणेकर याने जया पाटील यांचा खून केला.
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोनि अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चेतन मछले, फौजदार नानासाहेब कदम, पोलिस हवालदार प्रशांत शेवाळे, अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, संदीप आवळे, गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग, विशाल धुमाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |