05:38pm | Mar 24, 2022 |
कराड : तालुक्यातील कोपर्डे हवेली, पार्ले, वडोली निळेश्वर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर रेल्वेकडून भूयारी मार्ग करण्यात येत आहे. मात्र, या पुलाखाली पाणी साचत असून हा मार्ग वाहतूकीसाठी किंवा पायी चालत जाण्यासाठीही उपयोगात येत नाही. त्यामुळे स्थानिक, प्रवास्यांची गैरसोय होत असून रेल्वे विभागाने कायम स्वरूपी पाणी काढून द्यावे. तसेच रेल्वेच्या दोन्ही बाजूचे रस्ते भूयारी मार्गाला जोडावेत. अन्यथा, रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी नेते रयत क्रांतिचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या प्रश्नीमध्ये रेल्वेच्या अभियंत्यांना रयत क्रांतिच्या वतीने जिल्हाध्यक्ष नलवडे यांनी गुरुवार दि. २४ रोजी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वेच्या नवीन धोरणानुसार सर्व रेल्वे गेट बंद करून त्याठिकाणी भूयारी अथवा उड्डानपूल करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली, पार्ले व वडोली निळेश्वर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर रेल्वेचे स्वयंचालित गेट होते. ते सध्या बंद केले असून त्याठिकाणी भूयारी मार्ग पुल करण्यात येत आहे.
परंतु, सदर पुल जमिनीपासून साधारण २० फुट खोल असल्याने पुलाखाली पाणी साचत आहे. हे साचलेले पाणी रेल्वे विभागाने कायम स्वरूपी काढून देण्याची व्यवस्था करावी. तसेच रेल्वेच्या दोन्ही बाजुचे रस्ते भूयारी मार्गाला जोडावेत. या मागणीचे पत्र रयत क्रांतिचे सचिन नलवडे व ग्रामपंचायत पार्लेच्या वतीने मध्य रेल्वेचे उप कार्यकारी अभियंता एस.के सिंग यांना देण्यात आले होते.
यावेळी पुलाखाली साचलेले पाणी कायमस्वरूपी काढण्यासाठी पाईपलाइन करण्यात येणार असून रस्ते करण्यासाठी निधिची आवश्यकता असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
रेल्वेच्या भूयारी मार्गाखालील साचणारे पाणी कायमस्वरूपी न काढल्यास भविष्यात भूयारी मार्गाचा वाहतुकीसाठी व लोकांना पायी ये-जा करण्यासाठी कोणताही वापर करता येणार नाही. त्यामुळे साठणाऱ्या पाण्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा, यासाठी सचिन नलवडे व ग्रामस्थांनी दोनवेळा सदरचे काम बंद पाडले होते. यावेळी रेल्वेचे चीफ इंजीनियरिंग सक्सेना यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली होती. परंतु, गेल्या १५-२० दिवसात दिलेल्या आश्वासनांसंदर्भात रेल्वेकडून कोणतीच कारवाई न झाल्याने शेतकरी नेते सचिन नलवडे व पार्ले ग्रामस्थांच्या वतीने कराड येथील रेल्वे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना रेल रोको करण्याबाबतचा ईशारा देण्यात आला आहे.
अंमलबजावणी न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करणार
रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा झाली. यावेळी त्यांनी येत्या दोन दिवसात रेल्वेच्या भूयारी मार्गाखालील साचणारे पाणी काढून काम सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दोन दिवसात याची अंमलबजावणी न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
- सचिन नलवडे (शेतकरी नेते)
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |